Prajakta Mali Struggle Story
Prajakta Mali BirthdaySaam Tv

Prajakta Mali Birthday : आवड नसताना देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली; प्राजक्ता माळीबद्दल 'ही' खास माहिती

Prajakta Mali Struggle Story : आज प्राजक्ता माळीचा ३५ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Published on

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर आहे. प्राजक्ता एक बहुआयामी अभिनेत्री असून होस्ट, उद्योजिका आणि ती सिनेनिर्माती देखील आहे. प्राजक्ता चित्रपट, ओटीटी आणि टिव्ही सीरियल अशा सर्वच प्लॅटफॉर्मवर ती सक्रिय आहे. आज प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. प्राजक्ता माळीचा आज ३५ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया...

Prajakta Mali Struggle Story
Bigg Boss Marathi 5 : आर्या झाली बारामतीच्या रांगड्या गडीवर फिदा, वैभव-इरिनाला एकत्र पाहून ढसाढसा रडली; पाहा VIDEO

नृत्य आणि अभिनयात तरबेज असलेली महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजूला अभिनयात फारसा रस नव्हता. तिने स्वप्नातही केव्हा पाहिलं नव्हतं की आपण फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री होऊ. प्राजक्ता प्रसिद्ध नृत्यांगना आहे. तिचं संपूर्ण बालपण पुण्यातच गेलं आहे. प्राजक्ताने पुण्यातल्या ललित कला केंद्रात नृत्य विषयात एमए केले आहे. त्याचवेळी योगायोगाने तिची भेट मराठी इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध निर्मात्यांशी झाली. त्यांनी तिला ‘तांदळा’ चित्रपटात पहिली छोटी भूमिका दिली होती. ‘तांदळा’ चित्रपट तिचा पहिला मराठी चित्रपट आहे.

तेव्हापासून ते आजवर प्राजक्ताने मागेवळून पाहिलेले नाही. या चित्रपटानंतर प्राजक्ताला अनेक वेगवेगळ्या मराठी चित्रपटामध्ये ऑफर मिळाल्या. यासोबतच अभिनेत्रीने अभिनयासोबतच होस्टिंग करण्यासही सुरूवात केली. करियरच्या स्ट्रगलच्या सुरुवातीच्या काळात प्राजक्ताने अभिनयासोबतच कार्यक्रमात होस्टिंगचे काम घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे पैशाची गरज भागवण्यासाठी केले. पण त्याचमध्ये ती तरबेज होऊन स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Prajakta Mali Struggle Story
Samir Paranjape Post : “सांत्वन वैगरे काही नाही...”, मराठी अभिनेत्याची कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी भावुक पोस्ट

प्राजक्ताला विशेष ओळख 'जुळून येती रेशीम गाठी' मालिकेतून मिळाली. प्रेक्षकवर्गाने मालिकेला भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे प्राजक्ताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं करियर करण्याचे ठरवले. प्राजक्ताने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांसोबतच ‘रानबाजार’सारख्या वेब सीरिजमध्ये केलेली भूमिका सुद्धा खूप गाजली. 'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता सिनेनिर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निर्माती म्हणून प्राजक्ता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू पाहतेय.

Prajakta Mali Struggle Story
Naga Chaitnya Engagement : समंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य दुसरा संसार थाटणार ? आजच पार पडणार 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत साखरपुडा

याशिवाय, अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केल्यानंतर प्राजक्ता आता बिझनेसवुमन झाली आहे. प्राजक्ताने २०२२ मध्ये ‘प्राजक्तराज’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. त्यासोबतच प्राजक्ता कवियित्रीही आहे. तिने स्वत: लिहिलेला काव्य संग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे. बहुआयामी प्राजक्ता कायम चर्चेच्या अग्रस्थानी असते. प्राजक्ताचा कर्जतमध्ये निसर्गाचा खुशीत स्वत:चा फार्महाऊस देखील आहे. त्या फार्महाऊसमधील ती अनेक फोटोही शेअर करत असते. प्राजक्ताची कहाणी ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. प्राजक्ताने आपल्या कठोर परिश्रमाने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prajakta Mali Struggle Story
Shweta Tiwari Fitness Routine: चाळीशी ओलांडली तरी श्वेता तिवारी इतकी फिट अन् फाइन कशी? जाणून घ्या फिटनेसचं रहस्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com