Myra Vaikul As Shreya Budge Saam TV
मनोरंजन बातम्या

Myra Performance : मायराने हुबेहूब साकारली छोटी श्रेया बुगडे; नक्कल पाहून अभिनेत्रीला हसू आवरेना

Myra Mimic Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Pooja Dange

Chala Hawa Yeu Dya Viral Promo: 'चला हवा येऊ द्या' हा झी मराठीवरील कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या विनोदी कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून यावेळी बालकलाकार प्रेक्षकांना हसविण्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाचे नवीन पर्व 'लहान तोंडी मोठा घास' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध बालकलाकार सादरीकरण करताना दिसत आहेत.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यावर काही काळातच लोकप्रिय झाला. प्रेक्षक हा कार्यक्रम आवर्जून आणि न चुकता पाहतात.

कार्यक्रमातील कलाकरांनी सादरीकरण करताना त्यात जीव ओततात. भाऊ कदमचा कॉमेडी टायमिंग, कुशल बद्रिकेची बाप की अदालत, श्रेयाच्या नकला, निलेश साबळेचं निवेदन , सागर कारंडेची पुणेरी बाई या सगळ्यावरच प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. (Latest Entertainment News)

चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे नवीन पर्व

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाचे २०१४ पासून ९ वेगवेगळे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्र दौरा, लेडिज झिंदाबाद, होऊ दे व्हायरल, जगभर चला हवा येऊ द्या, सेलिब्रिटी पॅटर्न या विविध पर्वातून कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता चला हवा येऊ द्याचे नवीन पर्व 'लहान तोंडी मोठा घास' सध्या चांगलेच चर्चेत आहे. या पर्वात लहान उत्साद प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले आहे.

लहान तोंडी मोठा घास या पर्वात बालकलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहेत. या पर्वात तुझी माझी रेशीमगाठ फेम परी म्हणजेच मायरा वैकुल, तुझ्याच जीव रंगला फेम लाडू म्हणजेच राजवीरसिंह राजे, साईशा भोइरसह असे अनेक बालकलाकार कार्यक्रमातून आपल्याला दिसणार आहेत.

मायरा बनली छोटी श्रेया

कार्यक्रमाच्या नवीन पर्वाला सुरवात झाली आहे. कार्यक्रमात बालकलाकार प्रेक्षकांना हसवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. नुकत्याच कार्यक्रमाच्या सोमवारच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोलो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रोमोत मायरा वैकुल ही श्रेयाची नक्कल करताना दिसत आहे. मायरा ही छोटी श्रेया बनली आहे. तिने श्रेयासारखा ड्रेसही घातला आहे. या स्किटमध्ये मायरासोबत राजवीरही दिसत आहे. मायरा ही श्रेयाची हुबेहुब नक्कल करताना पाहून पुढे जाऊन मायरा ही श्रेया होणार असं अनेकजणांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. या प्रोमोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT