Myra Vaikul New Serial Neeraja Saam TV
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul New Serial: मायरा वायकुळचे हिंदीत पदार्पण; स्नेहा वाघसोबत साकारणार प्रमुख भुमिका

Myra Vaikul-Sneha Wagh: स्नेहा वाघ या मालिकेत मायराच्या आईचे काम करत आहे.

Pooja Dange

Myra Vaikul-Sneha Wagh In New Hindi Serial: टीव्ही मालिका हा प्रेक्षकांच्या अगदी जवळचा विषय आहे. मालिकांमधून प्रेक्षक कलाकारांना रोज भेटत असतात. प्रेक्षकांच कलाकारांशी एक वेगळं नातं निर्माण होत. अशीच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्सवर येणारी ही मालिका मराठी प्रेक्षकांसाठी खूप खास आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारे कलाकार मराठी आहेत.

कलर्सवर 'नीरजा' ही मालिका लवकरच टेलिकास्ट होणार आहे. या मालिकेत जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोचलेली मायरा वायकुल आहे. तसेच बिग बॉस फेम स्नेहा वाघ देखील या मालिकेत मुख्य पात्र साकारणार आहे. (Latest Entertainment News)

मायराने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, तुम्हला हे सांगताना खूप आनंद होतोय, माझी नवी मालिका येत आहे. धन्यवाद @colours मला ही संधी दिल्याबद्दल

नीरजा ही हिंदी मालिका आहे. तर त्यात दाखविण्यात आलेली कथा बंगालमधील. स्नेहा वाघ या मालिकेत मायराच्या आईचे काम करत आहे. ही कथा नीरजावर आधारित आहे.

नीरजा मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहे की, नीरजाला कोणीतरी खेळायला हाक देतं. ती तिच्या आईकडे बघते. तिची आई डोळ्यांनी नको असे सांगते. आईची नजर चुकवून नीरजा घराबाहेर जाते आणि पावसात तिच्या कागदाच्या होडीने खेळत असते. इतक्यत तिची आई येते आणि तिला पुन्हा घर घेऊन जाते.

आता नीरजाची आणि तिच्या आईची काय कथा हे आपल्याला मालिका प्रसारित झाल्यावर कळेल. तर दुसरीकडे मायर तिच्या या नवीन कामामुळे खूप आहे. तिच्या या पोस्टवर प्रार्थना बेहेरे आणि साईशा भोईर या तिच्या सहकालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच मायराचे चाहते देखील तिचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Broiler Chickens Death : ३६०० कोंबड्यांचा गूढ मृत्यू; पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 33 लिटर दुधाचा साठा जप्त

पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Kalyan Crime: घंटागाडीत सापडला महिलेचा मृतदेह, कल्याण- डोंबिवलीमध्ये खळबळ

Uttapam Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उत्तपम; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT