Ustad Rashid Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ustad Rashid Khan: संगीत क्षेत्राला मोठा धक्का, प्रसिद्ध गायक राशिद खान यांचं निधन

Priya More

Rashid Khan Passed Away:

संगीत क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध शास्त्रिय गायक राशिद खान (Rashid Khan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोग झालेल्या रशीद खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध गायक राशिद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रशिद खान यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. आयसीयूमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर १० जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राशिद खान यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मागच्या महिन्यात सेरेब्रल अटॅक आल्याने राशिद खान यांची तब्येत ढासळली होती. 55 वर्षीय राशिद खान यांच्यावर सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कोलकाता येथे हलवण्यात आले. याठिकाणी खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देखील देत होते. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अशातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये 1 जुलै 1968 मध्ये राशिद खान यांचा जन्म झाला होता. ते रामपूर- सहसवान घराण्यातून होते. उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणेही होते. त्यांची संगीताविषयी आवड सर्वात आधी त्यांचे काका गुलाम मुस्तफा खान यांनी ओळखली होती. वयाच्या 11 व्या वर्षी राशिद खान यांनी आपली पहिली मैफिल दिली. 1978 मध्ये त्यांनी दिल्लीतील आयटीसी कॉन्सर्टमध्ये मंचावर सहभाग घेतला.

राशिद खान यांनी वयाच्या 14 व्या वर्षी कोलकाताच्या आयटीसी संगीत रिसर्च अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. राशिद खान यांना 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारने गौरवण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT