Mumbai Pune Mumbai 4 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mumbai Pune Mumbai 4 : भन्नाट गाणी अन् स्वप्नील-मुक्ताची जबरदस्त केमिस्ट्री; 'मुंबई पुणे मुंबई ४' येतोय, पाहा VIDEO

Mumbai Pune Mumbai 4 Announcement : स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेचा 'मुंबई पुणे मुंबई ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

'मुंबई पुणे मुंबई 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मुंबई पुणे मुंबई 4' चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे यांचे आहे.

'मुंबई पुणे मुंबई 4' मधून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतला लोकप्रिय चित्रपट 'मुंबई पुणे मुंबई' पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर 'मुंबई पुणे मुंबई'चे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. तिन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 'मुंबई पुणे मुंबई' ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे एकत्र पाहायला मिळतात. तिन्ही चित्रपटातील गाणी खूपच भन्नाट आणि रोमँटिक आहेत. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या केमिस्ट्रीचे कायम कौतुक होत आले आहे.

आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'मुंबई पुणे मुंबई 4 'ची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे लवकरच 'मुंबई पुणे मुंबई' चा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 'मुंबई पुणे मुंबई' च्या पहिल्या तीन भागांची छोटी झलक पाहायला मिळत आहे आणि शेवटी 'मुंबई पुणे मुंबई 4 'ची (Mumbai Pune Mumbai 4 ) घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. प्रेक्षक 'मुंबई पुणे मुंबई 4 ' आणि स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे एकत्र पाहायला उत्सुक आहेत.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की," मराठीतील पहिला फ्रेंचायझी चित्रपट... आता त्याचा चौथा भाग येतोय...मुंबई पुणे मुंबई 4" तर व्हिडीओवर देखील हटके कॅप्शन दिले आहे. लिहिलं की, "15 वर्षांपूर्वी सुरू झाला एक रोमँटिक प्रवास..." त्यामुळे प्रेक्षक खूपच खुश आहेत. 'मुंबई पुणे मुंबई 4 ' चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे यांचे आहे. तर चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली करणार आहेत.

मुंबई पुणे मुंबईचा पहिला 2010ला रिलीज झाला होता. मुंबईची मुलगी गौरी आणि पुण्याचा मुलगा गौतम यांच्या लव्ह स्टोरी पाहायला मिळाली. त्यानंतर 2015मध्ये 'मुंबई पुणे मुंबई 2 ' रिलीज करण्यात आला, ज्यात लगीन घाई पाहायला मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये 'मुंबई पुणे मुंबई 3 ' प्रदर्शित झाला. ज्यात गौरी आणि गौतम आई-बाबा झाले. त्यांच्या आयुष्यात गोंडस बाळ आले. आता 'मुंबई पुणे मुंबई 4 ' कोणती कथा घेऊन येणार आणि गौरी आणि गौतमच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर वाहतुकीवरील तात्पुरते निर्बंध

Jammu and Kashmir: उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह, खिशात सापडली सुसाइड नोट

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

बेरोजगार तरुणांची फसवणूक थांबवा! बनावट रोजगार ॲप्सवर राम शिंदेंचा कडक इशारा|VIDEO

IAS Officers Transfers: धडाधड IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ आयुक्त आणि १० डीएमसह ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

SCROLL FOR NEXT