Palash Muchhal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Palash Muchhal: पलाश मुच्छलला कोर्टाचा मोठा दिलासा, काय आहे नेमकं प्रकरण?

Palash Muchhal Case: गेल्या काही काळापासून वादात अडकलेले गायक पलाश मुच्छल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.

Shruti Vilas Kadam

Palash Muchhal Case: प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाशी त्याचे लग्न तुटल्यापासून, गायकाबद्दल विविध अफवा पसरत आहेत. काही दिवसांपूर्वी स्मृती मंधानाचा मित्र विज्ञान माने याने गायकावर फसवणूकीचा आरोप केला होता. त्याने गायकाबद्दल अनेक टिप्पण्या देखील केल्या होत्या. त्यानंतर पलाशने विज्ञानविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. आता, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात पलाशला दिलासा दिला आहे.

पलाशविरुद्ध भाष्य करण्यास मनाई

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, पलाश मुच्छलने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने विज्ञान मानेविरुद्ध आदेश जारी केला आहे. पलाशचे वकील श्रेयांश आर. मिठारे यांनी या माहितीला दुजोरा दिला. न्यायालयाने विज्ञानला पलाशविरुद्ध सार्वजनिकरित्या कोणतीही टिप्पणी करू नये असे सक्त निर्देश दिले आहेत, कारण असे केल्याने पलाशची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. पलाशच्या वकिलांनी सांगितले या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे.

काय प्रकरण आहे?

क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा मित्र विज्ञान माने याने सांगली पोलिस ठाण्यात पलाशविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याने म्हटले आहे की ५ डिसेंबर २०२३ रोजी तो पलाशला भेटला आणि त्याला 'नजारिया' मध्ये निर्माता म्हणून गुंतवणूक करण्याची संधी दिली. त्यासाठी त्याने पलाशला एकूण ४० लाख रुपये दिले. पण, हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि विज्ञानचे पैसेही परत केले गेले नाहीत. या तक्रारीव्यतिरिक्त, विज्ञानने स्मृती आणि पलाशच्या लग्नादरम्यान घडलेल्या घटनांबद्दलही चर्चा केली आणि पलाशने तिची फसवणूक केल्याचे उघड केले.

पलाशने स्वतःचा बचाव करत विज्ञानच्या तक्रारी आणि विधानांनंतर, पलाश मुच्छलने त्याच्याविरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल केला. पलाशने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली. त्याने लिहिले होते की त्याच्या वकिलांनी विज्ञान मानेच्या खोट्या आरोपांसाठी त्याच्याविरुद्ध १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT