Amrita Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवं गाण आलं; काही तासांतच सोशल मीडियावर धुमाकूळ, ३० लाखांहून अधिक व्ह्यूज, काय म्हणाले नेटकरी?

Amrita Fadnavis New Song: अमृता फडणवीस यांचे नवे भक्तिगीत 'शंभू रे' प्रदर्शित झाले आहे. त्याचा संगीत व्हिडीओही रिलीज होताच अनेक कमेंट्स आल्या आहेत.
Amrita Fadnavis New Song
Amrita Fadnavis New SongSaam Tv
Published On

Amrita Fadnavis New Song: गायिका आणि सामाजिक व्यक्तिमत्व अमृता फडणवीस यांचे नवे भक्तिगीत ‘शंभू रे’ (Shambhu Re) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाशिवरात्री निमित्त प्रदर्शित झालेलं हे भजन भगवान भगवान शिव यांना अर्पण केलेले असून मनाला शांती देणारे आहे.

शंभू रे’ हे गीत टी-सीरिजच्या बॅनरखाली रिलीज करण्यात आले असून संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मोंटी शर्मा यांनी केले आहे. या भजनाचे लेखन श्रीजन वैश्नव यांनी केले असून, त्यातील भावनिक लय आणि भक्तिपूर्ण शब्दांनी हे गाणं काही वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीसाठी प्रेक्षकांना प्रेरित करतं.

Amrita Fadnavis New Song
Don 3: 'जर शाहरुख खान आला तर...'; 'डॉन ३' वादात ४० कोटी वाचवण्यासाठी रणवीर सिंगचा मोठा काउंटर

हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिले, जबरदस्त डायरेक्शन. आणखी एकाने लिहिले, आसामी पारंपारिक पोशाखात शूटिंग केल्याबद्दल धन्यवाद. तर एकाने लिहिले, अमृता मॅडम, तुमच्या सर्व गाण्यांपैकी मला हे गाणे सर्वात जास्त आवडले.

Amrita Fadnavis New Song
Rajpal Yadav: राजपाल यादवने कर्जाची अर्धी रक्कम फेडली, उर्वरित पैसे कोण देणार? वकिल म्हणाले...

हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिले, जबरदस्त डायरेक्शन. आणखी एकाने लिहिले, आसामी पारंपारिक पोशाखात शूटिंग केल्याबद्दल धन्यवाद. तर एकाने लिहिले, अमृता मॅडम, तुमच्या सर्व गाण्यांपैकी मला हे गाणे सर्वात जास्त आवडले.

अमृता फडणवीस यांनी याआधीही अनेक सामाजिक आणि भक्तिमय संगीतात आपला आवाज दिला आहे. त्यांच्या आधीच्या गाण्यांमध्ये 'मुंबई रिव्हर अँथम', 'अलग मेरा ये रंग है' आणि 'तु मंदिर तु शिवाला' यांसारखी गीतं चर्चेत आली आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com