Death News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Death News : प्रसिद्ध दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Film Director Father Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर वडिलांसोबतच्या आठवणी शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Shreya Maskar

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील प्रेम गोविंद सिन्हा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अनुभव सिन्हा यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. वडिलांच्या जाण्याने घर अचानक मोठे आणि रिकामे वाटू लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इतकेच नाही, तर आई-वडिलांच्या लग्नावेळचा एक खास किस्साही त्यांनी या पोस्टमधून सांगितला आहे.

अनुभव सिन्हा यांची पोस्ट

अनुभव सिन्हा यांनी वडिलांचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि हिंदीमध्ये एक नोट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं की, "अचानक, घर अधिक मोठं आणि रिकामं वाटू लागलं. अचानक, त्यांचे नवीन फोटो दिसेनासे झाले. अचानक, त्यांच्यासाठी नवीन मिठाई शोधणंही थांबलं. बाकी सगळं तसंच राहणार होतं. त्यांच्यावरचं प्रेम. त्यांच्याशी होणारे संवाद. सगळं तसंच राहणार होतं. नाही. सगळं नाही. ९५ वर्षं हा काही कमी काळ नाही, पण तो पुरेसाही नाही. आई मला सांगायची की, जेव्हा बाबा लग्नासाठी तिला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी गाण्याचा हट्ट धरला होता. त्यांनी त्यांचं आवडतं गाणं, 'छोटी सी ये जिंदगानी रे' गायलं होतं. मग, आम्हीसुद्धा अनेकदा त्यांच्याकडून हे गाणं ऐकायचो."

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अनुभव सिन्हा यांनी ही पोस्ट प्रेम गोविंद सिन्हा यांच्या निधनानंतर काही काळाने केली आहे. अनुभव यांचे वडील १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन पावले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी प्रेम गोविंद सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनुभव सिन्हा यांची कारकीर्द

अनुभव सिन्हा यांनी मनोरंजन क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कारकीर्द घडवली आहे. त्यांनी सुरुवातीला टेलिव्हिजन क्षेत्रात काम केले, त्यानंतर काही म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आणि २००१ मध्ये 'तुम बिन' या चित्रपटाद्वारे त्यांनी फीचर फिल्म दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'आपको पहले भी कहीं देखा है', 'दस', 'तथास्तु', 'कॅश', 'रा.वन' आणि 'तुम बिन २' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. २०१८ मध्ये 'मुल्क' चित्रपटापासून त्यांच्या दिग्दर्शनात एक वास्तववादी वळण आले. त्यानंतर त्यांचे २०१९ मध्ये 'आर्टिकल १५' आणि २०२० मध्ये 'थप्पड' हे चित्रपट आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डीलिमिटेशनसाठी राज्यातील खासदारांना 150 कोटी; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

Pune News : १९ वर्षीय विद्यार्थिनी लिफ्टमध्ये १४ तास अडकली, पुण्यातील नामांकित कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Accident: भरधाव बसची दुचाकीला धडक, एका कुटुंबातील चौघांसह ५ जणांचा मृत्यू

Election Result : पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; काँग्रेसची जोरदार मुसंडी; 2,990 जागांवर विजय

Aadhaar Verification : ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! आधार कार्डची पडताळणी आता घरबसल्या होणार; लगेच जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT