Morning Breakfast: १०० वर्षं तर काहीच नाही, आयुष्यभर आरोग्य राखायचंय? मग सकाळचा नाश्ता असा असावा

Dhanshri Shintre

सकारात्मक परिणाम

दिवसाची सुरुवात योग्य खाण्याने फक्त भूकेवर नाही, तर दीर्घायुष्यावरही सकारात्मक परिणाम होतो, असा तज्ञांचा ठाम विश्वास आहे.

Morning Breakfast | freepik

दिवसभरासाठी ऊर्जा मिळते

पौष्टिक नाश्ता केवळ दिवसभरासाठी ऊर्जा देत नाही, तर शरीर मजबूत ठेवून दीर्घायुष्य मिळवण्यासही महत्त्वाची भूमिका बजावतो, असं तज्ज्ञांचं मत.

Morning Breakfast | freepik

सकाळचा नाश्ता

नाश्ता शरीराला शक्ती देतो आणि आयुष्य वाढवतो. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ नाश्त्यात खाल्ले, तर तुम्ही १०० वर्षं जगू शकता.

Morning Breakfast | freepik

शरीरासाठी फायदेशीर

तज्ज्ञ म्हणतात, प्रथिने, संपूर्ण धान्य व भाज्यांनी भरलेला नाश्ता शरीरासाठी फायदेशीर ठरतो आणि दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचा बदल घडवतो.

Morning Breakfast | freepik

अंडी आणि पालक, टोमॅटो

अंडी-काजूतील प्रथिने वयानुसार स्नायू बळकट करतात, तर पालक, टोमॅटो, मिरपूडमुळे शरीराला आवश्यक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सहज मिळतात.

Morning Breakfast | freepik

ओटमील

ओटमीलसारखी संपूर्ण धान्ये हृदयरोग, मधुमेह आणि विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात, असं तज्ज्ञ म्हणतात.

Morning Breakfast | freepik

एवोकॅडो आणि नट्स

एवोकॅडो, ऑलिव्ह ऑइल आणि नट्स नाश्त्यात घेतल्यास शरीरासाठी आवश्यक निरोगी चरबी मिळते, जी एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Morning Breakfast | freepik

NEXT: सकाळी उपाशीपोटी एक वाटी कडधान्य खाल्ल्यास मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा