Mukhbir: The Story of a Spy Trailer Instagram/ @zee5
मनोरंजन बातम्या

Mukhbir Trailer: १९६५च्या भारत- पाकची सांगणार कहाणी 'मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय'

'मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय' वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून वेबसीरिजची पार्श्वभूमी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mukhbir Trailer Out: हल्ली भारतीय चित्रपटसृष्टीत देशभक्तीपर चित्रपट निर्मितीचे प्रमाण भरपूर वाढले आहे. सोबतच प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद ही मिळत आहे. काही ऐतिहासिक क्षण सध्या निर्माते आणि दिग्दर्शक मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न चांगला करत आहे. वेगवेगळ्या शैलीतील गुप्तहेरांच्या जीवनावर आधारलेले चित्रपट चांगलाच गल्ला जमवत आहे. 'बेबी', 'राझी', 'नाम शबाना' असे बरेचसे चित्रपट या श्रेणीमध्ये मोडतात.

आता हाच ट्रेण्ड मोठ्या पडद्यानंतर ओटीटीवर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली वेबसीरीज 'द फॅमिली मॅन' आणि ' स्पेशल ओप्स' सारख्या वेबसीरिज सर्व प्रेक्षकांचे लक्ष आपल्या वेधून घेतले. अशाच आशयावर आधारित 'मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय' (Mukhbir: The Story of a Spy) ही वेबसीरिज पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वेबसीरिजमध्ये प्रकाश राज, आदिल हुसेन आणि झेन खान दुर्रानी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. स्पेशल ऑप्सचे दिग्दर्शन करणाऱ्या शिवम नायर यांनी जयप्रद देसाई यांनी मिळून ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे.

वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या वेबसीरिजची पार्श्वभूमी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला भारताच्या हद्दीमध्ये पाकिस्तानचे टॅकर्स घुसखोरी करताना दिसतात आणि लगेच माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या कार्यालयातील दृश्य सुरू होतात.

कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला पंतप्रधान तेथील सविस्तर माहिती द्यायला सांगतात. त्यावेळी तो पाकिस्तानमध्ये आपले गुप्तहेर नसल्याचे सांगतो आणि एन्ट्री होते मुख्य पात्राची. त्यावेळी त्याचे काही प्रशिक्षणाचे दृश्य दाखवतात. वेबसीरिज मध्ये १९६५ च्या युद्धाचा भारताला काय फायदा होतो, हे दाखवण्यात आले. झेन खान दुरानीने या सीरिजमधल्या मुख्य नायकाचे पात्र साकारले आहे.

प्रकाश राज आणि आदिल हुसेन हे दोघे लष्करी भूमिकेत दिसत असून त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत बरखा सेनगुप्ता, झोया अफरोज, हर्ष छाया, सत्यदीप मिश्रा आणि करण ओबेरॉय हे कलाकार झळकणार आहेत. विक्टर टँगो एंटरटेनमेंट निर्मित असलेला 'मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय' ही वेबसीरिज ११ नोव्हेंबर रोजी झी 5वर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मेरे पास बंगला, गाडी', पूजा म्हणते 'तेरे जैसे ४'; गोविंद बर्गे प्रकरणात नर्तिकेचा 'तो' VIDEO व्हायरल

ZP president reservation : तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, सरकारने GR काढला

FIR On Actor: गँगस्टरवरील एका पोस्टमुळे अभिनेता अडचणीत, क्राइम ब्राँचमध्ये गुन्हा दाखल

Symptom of Tinnitus: कोणत्या भयानक आजारामुळे कानात शिट्टीचा आवाज येतो? लगेचच जाणून घ्या

Nashik News: गुन्हेगारी, ड्रग्ज आणि खड्ड्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरेसेना-मनसेचा जनआक्रोश मोर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT