mukesh khanna shaktimaan Google
मनोरंजन बातम्या

Mukesh Khanna : मुकेश खन्नाने 'शक्तिमान'चे हक्क देण्यास दिला नकार ; म्हणाले 'तुम्हाला बनवायचे असेल तर...'

Mukesh Khanna : शक्तिमानला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न यश राज फिल्म कडून करण्यात येत आहे. पण अभिनेता मुकेश खन्ना त्यासाठी हक्क देत तयार नसल्याचे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mukesh Khanna : नवदीच्या काळातील लहान मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे शक्तिमान गंगाधरही शक्तिमान हैं म्हणत अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले. या शक्तिमानला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न यश राज फिल्म कडून करण्यात येत आहे. पण अभिनेता मुकेश खन्ना त्यासाठी हक्क देत तयार नसल्याचे दिसून येत आहे.

'पुष्पा २' स्टार अल्लू अर्जुन शक्तीमानच्या भूमिकेसाठी सर्वात योग्य आहे असे मुकेश खन्ना यांनी सुचवले तेव्हा ते प्रकाशझोतात आले. त्याने असेही सांगितले की काही वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या टीमने त्याच्याशी संपर्क साधला होता आणि शक्तीमानचे हक्क विकत घ्यायचे होते, परंतु त्याने ही ऑफर नाकारली. यावेळी यश राज फिल्म मुकेश खन्नाच्या ऐवजी शक्तीमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग विचार करत होते मात्र त्यांना ही कास्टिंग आवडली नसल्याचे देखील त्यांनी काबुल केले.

एका मुलाखती दरम्यान मुकेश खन्ना म्हणाले, 'दहा वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या टीमने मला संपर्क केला होता. त्याने मला विचारले की मी त्याला शक्तीमानचे हक्क देऊ शकतो का?' त्याने पुढे सांगितले की योगायोगाने रणवीर सिंगच्या चाहत्याने शक्तीमानचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि नंतर अचानक त्याला हक्कांसाठी कॉल आला. मुकेशने हक्क देण्यास नकार दिला. ते म्हणाले की ते हक्क द्यायचे नाहीत कारण त्यांच्यामते आदित्य चोप्रा शक्तिमान नीट सादर करू शकणार नाहीत.

आदित्य चोप्राला खास ऑफर देण्यात आली होती

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, 'मी त्याला म्हणालो- आदित्यला सांग की तुला शक्तिमान पुन्हा बनवायचा असेल तर माझ्यासोबत बनव.' पण मी तुला शक्तिमान कोणा दुसऱ्या कलाकारांसोबत बनवण्याचे अधिकार देणार नाही. मी नकार दिला.

दरम्यान, मुकेश खन्ना म्हणाले की अल्लू अर्जुन शक्तीमानच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे त्यांनी सुचवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT