Isha Ambani Blessed With Twins Saam Tv
मनोरंजन बातम्या

Isha Ambani Blessed With Twins: मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

ईशा आणि आनंद आता जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. ईशाने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mukesh Ambani's daughter Isha gives birth to twins: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा अंबानीचे लग्न पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत झाले आहे. ईशा आणि आनंद आता जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. ईशाने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे.

ईशा अंबानी आणि दोन्ही मुले निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. ईशाने 19 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामुळे संपूर्ण अंबानी आणि पिरामल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. ईशा अंबानीचे 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत लग्न झाले. आनंद पिरामल हे राजस्थानचे आहेत. अजय पिरामल हे ईशा अंबानीचे सासरे आहेत. काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL)किरकोळ व्यवसायाची धुरा मुलगी ईशा अंबानीकडे सोपवली होती.

रिलायन्सच्या ४५ व्या एजीएममध्ये, मुकेश यांनी ईशाला समूहाची रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणून घोषित केले. या उद्योगपतीने आपल्या व्यवसायाच्या विभाजनात अनंत आणि आकाश या दोन मुलांइतकाच हक्क मुलीचा असल्याचे स्पष्ट केले. मुकेश अंबानी यांनी रिटेलची कमान ईशाकडे सोपवली आणि ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी धाकटा मुलगा अनंतकडे सोपवली. मोठा मुलगा आकाश याला आधीच समूहाची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. (Mukesh Ambani)

रिलायन्स रिटेलच्या चेअरमन ईशा अंबानी यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. तेथे तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात शिक्षिका बनण्याचे ईशा अंबानीचे स्वप्न होते, परंतु काळाच्या ओघात आज ती व्यावसायिक जगात उतरली आहे. (Reliance)

देशातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी असल्याने ईशा अंबानीकडे पैशांची कमतरता नाही, परंतु तरीही तिने नोकरीपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने अमेरिकेतील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले. 2014 मध्ये, ईशा अंबानीचा रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डात समावेश करण्यात आला. त्यानंतर तिने तिच्या वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. 2016 मध्ये फॅशन पोर्टल अजियो लाँच करण्याचे संपूर्ण श्रेय तिला जाते. मुकेश अंबानी यांनी असेही सांगितले आहे की, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लाँच करण्यामागे ईशा अंबानीची प्रेरणा होती. (Business)

मुकेश अंबानींना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. मोठी मुले आकाश अंबानी आणि ईशा अंबानी जुळी मुले आहेत. अनंत अंबानी सर्वात लहान आहेत. ईशा अंबानीचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. ईशा अंबानीला पियानो वाजवणे आणि फुटबॉल खेळणे आवडते. तिला लक्झरी कारचाही शौक आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर, पोर्श, मर्सिडीज बेंझ, मिनी कूपर, बेंटले या ब्रँडचा समावेश आहे. (Car)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT