Riteish and Genelia Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Riteish and Genelia: MSRTC साठी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ST सेवेला आधुनिक आणि आकर्षक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

Riteish and Genelia: महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाला (MSRTC) आता ग्लॅमरचा नवा टच मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची MSRTC चे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि प्रवाशांना एसटीकडे वळवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच रितेश आणि जेनेलिया यांच्यासोबत अधिकृत करार केला आहेत. हा करार सुमारे पाच वर्षांसाठी असण्याची शक्यता असून, या काळात ही जोडी एसटीच्या विविध जाहिराती, प्रचार मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.

एसटी महामंडळाच्या सेवेला अधिक आधुनिक आणि आकर्षक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांपर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्यासाठी या लोकप्रिय चेहऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. रितेश आणि जेनेलिया यांची लोकप्रियता लक्षात घेता, नव्या पिढीपर्यंत एसटीची प्रतिमा पोहोचवण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याआधीही MSRTC साठी प्रसिद्ध मराठी कलाकारांनी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम केले आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. आता रितेश-जेनेलिया यांच्या माध्यमातून ‘लालपरी’ला नवं रूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, रितेश आणि जेनेलिया सध्या त्यांच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. या चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जेनेलिया या चित्रपटात महाराणी सईबाईंची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमातून रितेशचा धाकटा मुलगा राहिल देशमुख हा देखील सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. अशातच त्यांची MSRTC ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांत प्रश्नपत्रिकांची खरेदी करून १५ लाखांत विक्री

PM मोदींच्या आवाहनानंतर महाविकासआघाडीचे अनोखे आंदोलन; थेट घोड्यावरून काढली सवारी

Panvel Picnic Spot : 'पनवेल'जवळ आहेत ५ हिल स्टेशन्स; कडक उन्हात मिळेल काश्मीरचा फिल, फॅमिलीसोबत एकदा जाच

Mohri Designs Pants: कुर्ता-टॉपवर ट्राय करा मोहरीची डिझाईन असलेल्या पँट आणि पलाझो, स्वस्त कपडेसुद्धा दिसतील डिझायनर

SCROLL FOR NEXT