Animal Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Animal Teaser: रणबीरच्या ‘ॲनिमल’चा धडाकेबाज टीझर रिलीज, रश्मिकाच्या साधेपणानं अख्खा भाव खाल्ला...

Animal Teaser News: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ॲनिमल’चा नुकताच सोशल मीडियावर धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Animal Teaser

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ॲनिमल’चा नुकताच सोशल मीडियावर धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. आज टीझर रणबीरच्या वाढदिवशीच प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चित्रपटातील अनेक पात्र समोर आले, आता त्यानंतर अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर समोर आला.

चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्याचं प्रमुख कारण म्हणजे, अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस. आज रणबीर त्याच्या फॅमिलीसोबतच त्याच्या चाहत्यांसोबत ४१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसानिमित्त रणबीरने चाहत्यांना गिफ्ट दिलं असल्यामुळे सध्या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे. टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित होताच टीझरमधील सर्वांच्याच लूकची प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसोबत, नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूरने प्रमुख भूमिका साकारलेली दिसून येत आहे.

शेअर केलेल्या टीझरमध्ये, सुरुवातीला रश्मिका आणि रणबीर दोघेही दिसतात. ते दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपबद्दल चर्चा करत असतात. पण वडीलांचे नाव ऐकताच तो जरा विचित्र पद्धतीने वागायला सुरुवात करतो. अनिल कपूरच्याही लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून त्याने ॲनिमलच्या वडीलांचे पात्र साकारले. काही कारणास्तव अनिल रणबीरच्या कानाखाली मारतो. चित्रपटामधील रणबीरच्या, रश्मिकाच्या, अनिलच्या आणि बॉबीच्या लूकची सध्या कमालीची चर्चा होताना दिसत आहे. टीझरमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठेच बॉबी देओल दिसत नाही. पण टीझरच्या शेवटच्या भागातच त्याच्या लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले.

टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘ॲनिमल’ची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. रणबीरसाठी हा चित्रपट एकदम स्पेशल असून या चित्रपटामध्ये त्याने सर्वाधिक लक्षवेधी पात्र या चित्रपटामध्ये साकारले आहे. चित्रपटाची आतापर्यंत एकूण तीन वेळा प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या होत्या. पण आता अखेर निर्मात्यांकडून १ डिसेंबर २०२३ ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT