Monalisa Bagal New Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'तू फक्त हो म्हण'... मोनालिसा कुणाला बोलतेय? लवकरच येणार नवाकोरा चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिल्यानंतर मोनालिसा बागल एक नवी कलाकृती घेऊन येत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिल्यानंतर मोनालिसा बागल एक नवी कलाकृती घेऊन येत आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळी कलाकृती सादर करणारी मोनालिसा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नव्या चित्रपटात ती कोणाच्या प्रेमात पडली आहे. हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 'तू फक्त हो म्हण' असे ती सांगत आहे. ती नेमकी कोणाच्या प्रेमात पडली आहे? ती कोणाला 'हो' म्हणायला सांगते हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीच आहे. तिचा आगामी 'तू फक्त हो म्हण' चित्रपट एन एच स्टुडिओ प्रस्तूत येत्या १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

संगीतातून उलगडणारी प्रेमकथा असलेल्या 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्मीते किरण बळीराम चव्हाण आणि डॉ. गणेशकुमार पाटील आहेत. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे सादरकर्ते आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल मोनालिसा सांगते, संगीतमय प्रेमकथा असल्याने मला हा चित्रपट करायचा होता. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या शेजारी देखील असू शकते. प्रेम हे असतंच पण त्या प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा यात पहायला मिळणार आहे. प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

अभिनेत्री मोनालिसा बागलसोबत अभिनेता निखील वैरागर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला गणेश देशमुख, तुकाराम बीडकर, पुष्पा चौधरी, सविता हांडे, डॉ.गणेशकुमार पाटील, झोया खान आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. तर मानसी नाईक ही चित्रपटात पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.

'तू फक्त हो म्हण' या चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांनी लिहिली आहे. तर चित्रपटातील गाण्यांना आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. 'तू फक्त हो म्हण' हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

४ नव्या अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत; महाराष्ट्रासहित ४ राज्यांना होणार फायदा, मार्ग आणि वेळापत्रक कसे असेल?

Mardaani 3 : हरवलेल्या मुली, भयावह कट आणि शिवानी रॉय; सस्पेन्सने भरलेला ‘मर्दानी 3’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Live News Update : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

SCROLL FOR NEXT