Monalisa On Sanoj Mishra: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Monalisa: 'मला १० वेळा हात लावला...'; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाचा प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Monalisa On Sanoj Mishra: 'महाकुंभ व्हायरल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाने दिग्दर्शक मनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज मिश्रा यांनी अनेकदा आपला अयोग्य प्रकारे स्पर्श केला, असे तिने म्हटले आहे.

Shruti Vilas Kadam

Monalisa On Sanoj Mishra: ‘महाकुंभ व्हायरल गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेली मोनालिसा भोसले सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने केरळमध्ये तिचा मुस्लिम प्रियकर फहमान खान याच्यासोबत हिंदू पद्धतीने लग्न केले. या अचानक झालेल्या लग्नामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, या कपलवर ‘लव्ह जिहाद’चे आरोप करण्यात आले आहेत. या वादात आता मोनालिसाने दिग्दर्शक मनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

कोची येथील पत्रकार परिषदेत मोनालिसा पती फहमानसोबत माध्यमांसमोर आली. यावेळी तिने रडत सांगितले की, तिला आणि तिच्या पतीला सध्या धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. याच दरम्यान तिने मनोज मिश्रा यांच्या वर्तनाबाबत धक्कादायक खुलासे केले.

मोनालिसाने आरोप केला की, चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मनोज मिश्रा यांनी तिच्याशी अयोग्य वर्तन केले. “त्यांनी अनेकदा मला अयोग्यरित्या स्पर्श केला. मी काय सहन केलं आहे, हे फक्त मलाच माहीत आहे,” असे ती म्हणाली. तिने पुढे सांगितले की, जेव्हा तिने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा त्यांनीही तिची साथ दिली नाही. तिने मनोज मिश्रा यांच्यावर तरुणींना कामाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप केला. ती म्हणाली, “तो मुलींना चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देतो आणि बदल्यात अयोग्य मागण्या करतो.” या आरोपांमुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांत तक्रार का केली नाही, यावर बोलताना मोनालिसाने सांगितले की, 'मी तक्रार करण्याचा विचार केला होता; मात्र कुटुंबीयांनी मला थांबवले. माझ्या कुटुंबीयांनी साथ दिली नाही, त्यामुळे मी एकटी पडले,' असे ती म्हणाली. यासह तिने सरकारकडे मदतीचीही मागणी केली आहे. याशिवाय, ती म्हणाली, 'मनोज मिश्रा माझ्या पतीला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे जे पूर्णपणे खोटे आहे.'

दरम्यान, ११ मार्च रोजी केरळमध्ये झालेल्या या लग्नानंतर मोनालिसा आणि फहमान यांना सतत धमक्या मिळत असल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियासह चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT