Swara Bhasker Maternity Shoot Instagram @reallyswara
मनोरंजन बातम्या

Swara Bhasker Maternity Shoot: स्वरा भास्करचं नॉन-ग्लॅमरस मॅटर्निटी शूट; पतीसोबत रोमँटिक फोटो केले शेअर

Pooja Dange

Mom To Be Swara Bhasker's Maternity Shoot:

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या घरी नवीन पाहूण्याचे आगमन होणार आहे. स्वरा आणि फाहद यांनी १६ फेब्रुवारीला लग्न केले. त्यानंतर काहीच महिन्यांनी स्वराने तिच्या बाळाच्या आगमनाच्या बातमी शेअर सगळ्यांना धक्का दिला आहे.

स्वरा भास्करने जिव्हा तिच्या लग्नाविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली तेव्हा सगळेच शॉक झाले होते. कोर्टात लग्न झाल्यानंतर स्वराचा पारंपरिक पद्धतीने ग्रँड सोहळा पार पडला. लग्न झाल्यानंतर स्वराने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा चकित केले.

स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळो चर्चेत असते. समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं. लग्नाच्या चार महिन्यानंतर स्वराने त्यांच्या जीवनात चिमुकल्याचा आगमन होणार असल्याचे सांगितले.

आता स्वराने तिच्या मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत स्वराने लिहिले आहे की, 'कधी कधी जीवनात काही अनपेक्षित आशिर्वात मिळतात आणि त्यानंतर तुमचा स्वतःला शोधण्याचा आणि एकत्र आयुष्य जगण्याचा प्रवास सुरू होतो.'

स्वरा भास्करने तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट आणि काही कलरफुल फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्वराने डिपनेक व्हाईट गाऊन घातला आहे. ज्यावर निळ्या रंगाचे प्रिंट आहे. तर फहादने आकाशी रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत. (Latest Entertainment News)

स्वराच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट करू त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत.

मार्च २०२३ मध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केले. साखरपुडा, हळद, मेहेंदी, संगीत, रिसेप्शन असं पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला राहुल गांधीसह अनेक दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते.

स्वराच्या या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत. तिचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रेटी स्वरा आणि फहादचे अभिनंदन करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT