मुंबई : सध्या बॉलिवूडचे (Bollywood) अनेक चित्रपट प्रदर्शित आहेत. तर काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यात आता 'मोदी जी की बेटी' हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गोव्यात फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या बॉलिवूड चित्रपटाविषयी उत्सुकता लागली होती. या चित्रपटाविषयीची नवीन अपडेट समोर आली आहे.
२०१९ मध्ये गोव्यात फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'मोदी जी की बेटी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाच्या शिर्षकाने उपस्थित सर्वाचंच लक्ष वेधले होते. आता या चित्रपटाबद्दलची माहिती खुद्द निर्मात्यांनी दिली आहे. (Modi Ji Ki Beti Motion Poster bollywood film will be release on 14 oct Latest Update)
नुकतंच एडी सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये एक मुलगी बुरखा घातलेली आहे. ती हात जोडून उभी असल्याचे दिसते. त्याचबरोबर अनेक चॅनल्सचे बुम तिच्यासमोर दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत एडी सिंगने "ना ऐकले ना पाहिले ... कशी घडली ही घटना ? म्हणूनच सांगायला येत आहे मोदी जी की बेटी" असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. याशिवाय पोस्टरमध्ये त्यांनी चित्रपट रिलीजच्या बदललेल्या तारखेबद्दलची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
चित्रपट हा पूर्णत: सस्पेंन्सनी भरलेला आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल अद्यापही कोणता खुलासा करण्यात आला नाही. चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज होताच तूफान व्हायरल होत आहे.
मोशन पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एडी सिंगच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने 'हा चित्रपट पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहे, शुभेच्छा एडी' असे लिहिले आहे, तर 'वाह दादा' अशी कमेंट एका यूजरने केली आहे.
मोदी जी की बेटी हा एक अॅक्शन विनोदी चित्रपट आहे. ज्याचे जाहिरात क्षेत्रात काम करणारे फिल्ममेकर एडी सिंह यांनी दिग्दर्शन केले असून, या चित्रपटाच्या माध्यमातूनच तो सिनेविश्वात पदार्पण करत आहेत. तर चित्रपटाची कथा अवनी मोदीने लिहिली असून तिनेच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात पित्तोबाश त्रिपाठी, अवनी मोदी आणि विक्रम कोचर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट १४ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Edited By - Nandkumar Joshi
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.