Vishakha Subhedar Post  Instagram
मनोरंजन बातम्या

Vishakha Subhedar: राज ठाकरेंनी हास्यजत्रेतील ‘या’ कलाकाराला दिलं दिवाळीनिमित्त स्पेशल गिफ्ट, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Chetan Bodke

Vishakha Subhedar

सध्या सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. दिवाळी म्हटलं की, भेटवस्तू, फराळ आणि इ... गोष्टी आल्याच. जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण दिवाळी सण साजरा करताना दिसत आहे. प्रत्येकालाच खास सणानिमित्त भेटवस्तू मिळतच असतात. अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदारला दिवाळीचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटवस्तू दिली आहे. अभिनेत्रीने पोस्ट करत त्यांचे आभार मानले.

विशाखा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “साहेब मनापासून धन्यवाद..! तुमची गोष्टच भारी.
इतकं लक्षात ठेवून डायरेक्ट घरी फराळ पाठवला. त्याबद्दल एक मनसे कार्यकर्ती म्हणून खूप आनंद झाला. जय मनसे.” असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. विशाखाला मिळालेल्या भेटवस्तूमध्ये फराळ, चांदीचा दिवा, मेणाचे दिवे यांचा समावेश असून राज ठाकरे खास नोट पाठवत विशाखाला शुभेच्छा दिल्या आहेत.

विशाखा सुभेदारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विशाखाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या स्टार प्रवाहावर टेलिकास्ट होणाऱ्या ‘शुभविवाह’ मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. त्यासोबतच प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्र’ नाटकामध्ये अभिनय करत आहे. तिच्यासोबत नाटकामध्ये मुख्य भूमिकेत काही हास्यजत्रेतले कलाकारही दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT