Miss Universe 2023 Winner Sheynnis Palacios Twitter/ @ Miss Universe
मनोरंजन बातम्या

Miss Universe 2023 Winner: २३ वर्षांच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब; सौंदर्यवती भावुक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल

Miss Universe 2023: ‘मिस युनिव्हर्स २०२३’ची विजेती निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस ही ठरली आहे.

Chetan Bodke

Miss Universe 2023 Winner Sheynnis Palacios

मिस युनिव्हर्स स्पर्धा रविवारी मोठ्या थाटामाटात पार पडली. ‘मिस युनिव्हर्स २०२३’ (Miss Universe 2023) ची विजेती निकारागुआच्या (Nicaragua) शेनिस पॅलासिओस ही ठरली आहे. शेनिस पॅलासिओस हिने ७२ वा मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती होण्याचा किताब मिळवला आहे.

जगभरातील अनेक सौंदर्यवतींना मागे टाकत शेनिस पॅलासिओस (Sheynni Palacios) हिने हा मुकुट परिधान केला आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०२३ ची ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा एल साल्वाडोर येथील जोसे अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. २०२२ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) हिने 'मिस युनिव्हर्स २०२२' (Miss Universe 2022) स्पर्धेचा किताब जिंकला होता.

आर बोनी गॅब्रिएलच्या हस्ते २०२३ मध्ये झालेल्या शेनिस पॅलासिओसला मुकुट परिधान करण्यात आला. मुकुट परिधान केल्यानंतर शानिस पॅलासिओस खूप भावूक झाली होती. तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दिसत होते. (Miss Universe)

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी शॅनिस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली महिला आहे. त्यामुळे ‘ब्युटी क्वीन’ हा किताब जिंकणे तिच्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. सध्या संपूर्ण जगात फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोसची च चर्चा होत असून तिने पाहिलेल्या सर्वत्रच जोरदार कौतुक होत आहे. किताब पटकवल्यानंतर शॅनिस पॅलासिओसचे जगभरातल्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Hollywood)

२०२३ च्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत निकारागुआसह थायलंड आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन सुंदरींनी टॉप 3 मध्ये आपले स्थान निर्माण केले. पण उर्वरित दोघींनाही पराभूत करत निकारागुआच्या शॅनिस पॅलासिओसने ‘मिस युनिव्हर्स २०२३’ चा मुकुट जिंकला आहे. (Entertainment News)

थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ही सौंदर्य स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली, तर ऑस्ट्रेलियाच्या मोराया विल्सन दुसरी उपविजेती ठरली आहे. यंदाच्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्वेता शारदाने भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप २० फायनलिस्टमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, तिला ताज जिंकता आला नाही. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT