भारताची हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स; या प्रश्नाचे उत्तर देऊन विजेतेपद पटकावले Saam Tv
मनोरंजन बातम्या

भारताची हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स; या प्रश्नाचे उत्तर देऊन विजेतेपद पटकावले

जगातल्या सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या हरनाज संधूने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगातल्या सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. जगातील या सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेत विजय मिळवत हरनाज आज मिस युनीव्हर्स (Miss Univers 2021) ची मानकरी ठरली आहे. इस्रायलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये फॅशन आणि सौंदर्यविश्वात मोठे महत्त्व आहे. (miss universe 2021 harnaaz sandhu answer on climate change)

हे देखील पहा-

तब्बल २१ वर्षांनंतर हा मिस युनिव्हर्सचा मुकुट हरनाजने भारतात परत आणला आहे. यावर्षी १२ डिसेंबरला इस्रायलच्या दक्षिणेकडील इलात शहरामध्ये ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. जगभरामधून आलेल्या सुंदर मुलींशी स्पर्धा करण्याकरिता भारताकडून हरनाज संधू या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिला एक प्रश्न विचारण्यात आला आणि याच प्रश्नाच्या उत्तराने तिला मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळाला आहे.

अनेक लोकांना वाटते की क्लायमेट चेंज ही मोठी समस्या आहे, तुला याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरनाज म्हणाली, "हवामान बदल ही गंभीर समस्या असून, मला त्याच्या विषयी काळजी वाटते. त्यावर काम करणे गरजेचे आहे. हे सर्व आपल्या निष्काळजीपणामुळे होत असते. तुम्ही केलेली कृती पर्यावरणाला वाचवू शकते.

एखादी गोष्ट नंतर सुधारण्यापेक्षा त्यासाठी अगोदरच काळजी घेतलेली उत्तम." याच उत्तरामुळे परीक्षकांनी तिला विजयी घोषित केले आहे. दरम्यान, अभिनेत्री लारा दत्ताने २००० मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षेनंतर हरनाजने 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट भारतात आणला आहे. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला आहे. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT