Milind Gawali Write Post Corruption In Mumbai Police Instagram
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: “एखादा पोलीस कितीही भ्रष्टाचारी असला तरी…”, मिलिंद गवळीने असं का म्हटलं?

Milind Gawali Post: मालिकेच्या ट्रॅकचा आधार घेत अभिनेता मिलिंद गवळीने एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Milind Gawali Write Post Corruption In Mumbai Police

कायमच टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहिलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये नेहमीच सर्वांच्या विरोधात राहणारा आणि चिड चिड करुन बोलणारा अनिरुद्ध आरोहीला न्याय देण्यासाठी तिच्या पाठी उभा राहतो.

गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये आरोही या पात्राची एन्ट्री झाली. काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये तिच्यावर काही मुलांनी बलात्कार केल्याचे दाखवले. त्या घटनेमध्ये देशमुख कुटुंबीय आरोहीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहताना दिसत आहे. मालिकेच्या ट्रॅकचा आधार घेत अभिनेता मिलिंद गवळीने एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “अनिरुद्ध देशमुख ज्यावेळी असा स्टँड घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की, आता या माणसाचं काय करायचं. माणूस इतका चांगला पण वागू शकतो ?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही, अनिरुद्ध च नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही सिच्युएशन मध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, सरप्राईज करतो सगळ्यांना, मी पण ज्या वेळेला स्क्रिप्ट वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात, मनातल्या मनात नमिता वर्तक हिला थँक्यू सुद्धा म्हणत असतो.”

“पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठाम भूमिका घ्यायलाच हवी , योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी, मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये करप्शन आहे, पण एखादा पोलिस वाला कितीही करप्ट असला तरी असं म्हटलं जातं की रेप, मर्डर, ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि ड्रग्स या केसेस मध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही , गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही, कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं.”

“या सिन मध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्ध ची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुख च्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात, पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे”, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT