भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजच्या सामन्याची सुरुवात कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सने सुरू झाली. अरिजित सिंगपासून ते अगदी सुनिधी चौहानपर्यंत अनके प्रसिद्ध गायक यावेळी उपस्थित होते.
भारत - पाकिस्तान सामन्याआधी अरिजित सिंगने त्याच्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. अरिजित सिंगने 'रॉकी ओर रानी की प्रेम कहानी'मधील 'तुम क्या मिले' तसेच 'लेहरा दो' ही गाणी गायली. 'चलेया', 'हीरीये', 'ए वतन', 'झुमे जो पठान' या गाण्यांसह गुजराती लोकगीते देखील गायली. याचे अनेक व्हिडीओ स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही आणि अरिजित सिंगच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अरिजित सिंगनंतर सुनिधी चौहानने तिचे धमाकेदार सादरीकरण केले. शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंग यांनी 'बुम्बरो बुम्बरो', 'सुनो गौर से दुनियावालो' हे गाणी गायली. शेवटी सगळ्या गायकांनी मिळून 'वंदे मातरम' गायले. हे सगळे परफॉर्मन्स टीव्ही किंवा ऑनलाईन कुठेही दाखविण्यात आलेले नाहीत.
भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान सलमान खान देखील स्टुडिओमध्ये उपस्थित होता. सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'टायगर ३'चे प्रमोशन करण्यासाठी तेथे गेला होता. हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ हे यावेळी स्टुडिओमध्ये उपस्थित होते. ''टायगर ३'चा ट्रेलर १६ ऑक्टोबरला आऊट होणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा दर्जा तुमच्या लक्षात येईल. यावेळी चित्रपट नेहमीपेक्षा खूप वेगळा असणार आहे.' असे सलमानने सांगितले. (Latest Entertainment News)
यावेळी सलमानसोबत एक खेळ देखील खेळण्यात आला. तेव्हा सलमान खानने विराट कोहली दबंगमधील चुलबूल पांडे, रोहित शर्माला बजरंगी भाईजान म्हटलं. तर केएल राहुल त्याचा आवडता खेळाडू असल्याचे देखील सलमान खानने सांगितले. 'अडचणीच्या वेळी केएल राहुल प्रेशर सहन करू शकतो' असे सलमान म्हणाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.