Metro In Dino Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक, वाचा संडे कलेक्शन

Metro In Dino Box Office Collection Day 3 : 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाने वाकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने रविवारी किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

दिग्दर्शक अनुराग बासू यांचा 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) चित्रपटाने रविवारी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या कलेक्शमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. चित्रपट रिलीज होऊन 3 दिवस झाले आहेत. सारा अली खानचा 'मेट्रो इन दिनों' चित्रपट 4 जुलैला रिलीज झाला आहे. चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'मेट्रो इन दिनों' हा एक रोमँटिक ड्रामा आहे.

'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाची पहिल्या दिवशी संथ सुरूवात झालेली पाहायला मिळाली. मात्र वीकेंडला चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच 'मेट्रो इन दिनों' आपले बजेट वसूल करेल असे दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या रविवारी किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात.

'मेट्रो इन दिनों' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

  • दिवस पहिला - 3.5 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 6 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 7.25

  • एकूण - 16.75 कोटी रुपये

'मेट्रो इन दिनों'चा नवा रेकॉर्ड

'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो' या 2007 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. 'लाइफ इन अ मेट्रो' चित्रपटात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, के के मेनन, शायनी आहुजा, शिल्पा शेट्टी, कंगना रणौत आणि शर्मन जोशी हे तगडे कलाकार पाहायला मिळाले.'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाने आता 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाने तीन दिवसांत 16.75 कोटी रुपये कमावले आहेत. तर मीडिया रिपोर्टनुसार, 'लाइफ इन अ मेट्रो' चित्रपटाने 15.63 कोटींची कमाई केली होती.

'मेट्रो इन दिनों' स्टारकास्ट

'मेट्रो इन दिनों' चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Day Gifts : स्वस्तात मस्त ८ युनिक गिफ्ट आयडिया, शिक्षक होतील खुश

Maharashtra Live News Update: अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

Pune Crime: पुणे हादरले! ऐन गणेशोत्सवात मुळशी पॅटर्न थरार, तरुणावर कोयत्याने सपासप वार; VIDEO व्हायरल

Amruta Deshmukh: अमृताचं मराठमोळं सौंदर्य! पैठणी साडीत दिसतेय लय भारी

Ashish Kapoor : बलात्कार प्रकरणात अभिनेत्याला बेड्या, कोण आहे आशिष कपूर?

SCROLL FOR NEXT