Metro In Dino SAAM TV
मनोरंजन बातम्या

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Metro In Dino Box Office Collection Day 1 : सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरचा 'मेट्रो इन दिनों' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित चित्रपट 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट (4 जुलै)ला रिलीज करण्यात आला आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले आहे. 'मेट्रो इन दिनों' हा एक रोमँटिक ड्रामा आहे. यात प्रेम कथा दाखवण्यात आल्या आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

'मेट्रो इन दिनों' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'मेट्रो इन दिनों' चित्रपटाची संथ सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट 85 कोटी रुपये आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 'मेट्रो इन दिनों' चित्रपट वीकेंडला किती कोटींचा व्यवसाय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'मेट्रो इन दिनों' स्टारकास्ट

'मेट्रो इन दिनों' चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.

'मेट्रो इन दिनों'

'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो' या 2007 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, के के मेनन, शायनी आहुजा, शिल्पा शेट्टी, कंगना रणौत आणि शर्मन जोशी पाहायला मिळाले. आजही या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता 'मेट्रो इन दिनों' किती गाजणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT