archana  puran singh
archana puran singh Saam tv
मनोरंजन बातम्या

सोशल मीडियावर होतोय अर्चना पूरन सिंहवर मीम्सचा तुफान पाऊस; जाणून घ्या कारण

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू , काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना १९८८ च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायायलयाने १ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू पटियाला कोर्टाला शरण गेले आहेत. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांना एक वर्षाची शिक्षा दिली आहे. त्यानंतर 'द कपिल शर्मा शो' कार्यक्रमातील स्पेशल परीक्षक अर्चना पूरन सिंह (archana puran singh) यांच्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस होत आहे. (memes viral on archana puran singh after Navjyot Singh Sidhu jailed for a year)

हे देखील पाहा -

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू हे पाटियाला कोर्टाला शरण गेले आहेत. मात्र, त्यांना शिक्षा झाल्यानंतर ट्विटरवर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. या मीम्सच्या माध्यमातून अर्चना पूरन सिंह आनंदी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू यांच्यानंर अर्चना या कॉमेडियन 'कपिल शर्मा के शो' या कार्यक्रमामध्ये परीक्षकाची खूर्ची सांभाळली. त्यावेळी सेटवर येणारे कलाकार आणि चाहते हे अर्चना यांना तुम्ही सिद्धू यांची खूर्ची हडपली असे टोमणे मारायचे. याआधीही दोघांवरून मीम्स व्हायरल झाले होते.

दरम्यान, आता अर्चना यांच्यावर तुफान मीम्स व्हायरल होत आहे. एक युजर मीम्सच्या माध्यमातून म्हटला आहे की, एक वर्षापर्यंत अर्चना पूरन सिंह यांना आता एक वर्षासाठी 'द कपिल शर्मा शो' यांच्या कार्यक्रमातून हटवणे अवघड आहे. आता वर्षभर तरी अर्चना यांना सिद्धू यांची काही भीती नाही. यामुळे अर्चना या खूप झाल्या असतील. दुसरा युजर म्हणाला की, 'आता अर्चना सिंह यांची हसणं आता तिप्पट वाढले असेल. कारण आता सिद्धू हे तुरुंगात गेले आणि त्यांची 'द कपिल शर्मा शो'मध्ये आरक्षित झाली.' असे अनेक मीम्स सोशन मीडियावर व्हायरल होत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार

SCROLL FOR NEXT