Marathi Show SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Show : लहानग्यांसाठी सुरू होणार नवीन शो; 'स्टार प्रवाह'नं शेअर केला VIDEO, तारीख काय?

Star Pravah New Show Announcement : 'स्टार प्रवाह' वाहिनीवर नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे. हा शो खास लहान मुलांसाठी आहे. कार्यक्रमाचे नाव आणि रिलीज डेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'स्टार प्रवाह' वाहिनीवर नवीन शो सुरू होत आहे.

नुकताच नवीन शोचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

नवीन मराठी शो लहान मुलांसाठी असणार आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवर नवीन कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळत आहे. अलिकडेच 'वचन दिले तू मला' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अजून एक शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो खास लहान मुलांसाठी असणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीने नुकताच शोचा प्रोमो शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवीन शोचे अपडेट जाणून घेऊयात.

नवीन कार्यक्रमाचे नाव

'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' हा शो सुरू पुन्हा सुरू होणार आहे. हे 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' चे चौथे पर्व आहे. हा शो खास करून लहान मुलांच्या गाण्याच्या आवडीला प्रोत्साहन देणारा आहे. हा शो 3 जानेवारीपासून 'स्टार प्रवाह' वर पाहता येणार आहे. तसेच शनिवार आणि रविवारी रात्री 9:00 वाजता 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद - पर्व 4' पाहायला मिळेल .

मीडिया रिपोर्टनुसार 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद - पर्व 4' चे परिक्षण गायिका वैशाली सामंत करणार आहे. या सीझनमध्ये कोणते बाल कलाकार पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील छोटे उस्ताद येथे येऊन आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालतात.

'वचन दिले तू मला' रिलीज डेट?

मिलिंद गवळी मुख्य भूमिकेत असलेली मालिका 'वचन दिले तू मला' 15 डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT