Shreya Maskar
म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यामध्ये असलेले एक सुंदर आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.
म्हैसमाळ सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. म्हैसमाळला मराठवाड्याचे 'महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात म्हैसमाळ या हिल स्टेशनला भेट द्या. येथे थंडगार वातावरण अनुभवता येते. कपल्ससाठी म्हैसमाळ बेस्ट लोकेशन आहे.
म्हैसमाळ हे खुलदाबादजवळ असलेले एक सुंदर हिल स्टेशन असून एलोरा लेणी, घृष्णेश्वर मंदिर या प्रमुख पर्यटन स्थळांच्या मार्गावर येते.
म्हैसमाळ येथील गिरिजादेवी मंदिर आणि बालाजी मंदिर ही प्रमुख धार्मिक आणि पर्यटन आकर्षणे आहेत.
शिल्पकलेचा आणि वास्तू कलेचा उत्तम नजारा पाहायचा असेल तर वेरूळची लेणी आणि अजिंठा लेणी या ठिकाणांना भेट द्या.
म्हैसमाळ येथील प्रत्येक लोकेशन फोटोशूटसाठी बेस्ट आहे. तुम्ही येथे हनिमून देखील प्लान करू शकता. येथे तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.