Shreya Maskar
नवीन वर्षात पहिली ट्रिप कोकणात प्लान करा. येथे रत्नागिरीतील आंजर्ले बीचवर तुम्ही धमाल, मजा-मस्ती करू शकता.
आंजर्ले बीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातच वसलेला आहे. जो त्याच्या सुंदर, स्वच्छ किनारा आहे.
जोग नदीच्या मुखाजवळ आंजर्ले बीच हा एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. येथे जोग नदी समुद्राला मिळते.
आंजर्ले बीच नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. स्वच्छ वाळू, पाणी आणि नैसर्गिक शांततेसाठी हा बीच ओळखला जातो.
आंजर्ले बीचवर बोटिंगचा आनंद नक्कीच घेऊ शकता. तसेच येथे पोहता देखील येते. येथे बनाना बोट राइड, पॅरासेलिंगचा अनुभव घेता येतो.
आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. उजव्या सोंडेची काळ्या दगडाची गणेशमूर्ती यथे आहे.
समुद्र आणि नदीच्या संगमावरील निसर्गरम्य दृश्य तुम्हाला येथे पाहायला मिळते. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.