Shreya Maskar
हिवाळ्यात साताऱ्यात ट्रेकिंगचा प्लान करा. येथे सुंदर ठिकाणे पाहायला मिळतात. तसेच येथे दातेगड हे एक ऐतिहासिक ठिकाण देखील आहे.
दातेगड हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेला एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला निसर्गरम्य असून चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाने वेढलेला आहे,
दातेगड या डोंगराळ किल्ल्याला सुंदरगड असेही म्हणतात. किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. दातेगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत आहे.
दातेगड किल्ल्यावर तलवारीच्या आकाराची एक भव्य आणि ऐतिहासिक विहीर आहे. दातेगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
दातेगडाच्या पायथ्याशी असलेल्या टोळेवाडी या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी चढाई केली जाते. हा ट्रेक मध्यम स्वरूपाचा आहे.
साताऱ्यात कास पठार, तोसेघर धबधबा, सज्जनगड किल्ला ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि न्यू इयर आहे. त्यामुळे तुम्ही फॅमिली ट्रिप, मित्रमंडळींसोबत पिकनिक , तसेच जोडीदारासोबत येथे फिरायला जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.