Shreya Maskar
रोहिडा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. हा किल्ला भोर तालुक्यात स्थित आहे. हिवाळ्यात या ठिकाणी फॅमिलीसोबत नक्की ट्रिप प्लान करा.
रोहिडा किल्ल्याला विचित्रगड, बिनीचा किल्ला आणि रोहिडेश्वर किल्ला या नावांनीही ओळखला जाते. किल्ल्याची विचित्र आणि असामान्य रचना यामुळे रोहिडा किल्ल्याला विचित्रगड नाव पडले.
रोहिडा किल्ला एक डोंगरी किल्ला आहे. भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला आहे. रोहिडा किल्ला नीरा नदीच्या खोऱ्यात, म्हणजेच 'रोहिड खोऱ्या'मध्ये वसलेला आहे
रोहिडा किल्ला हा ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. वीकेंडला मित्रांसोबत फिरण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रोहिडा किल्ल्याला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. येथे गेल्यावर तुम्ही सुंदर निसर्गाचे फोटो काढू शकता.
रोहिडा किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे आणि मुघल यांच्यातील युद्धभूमी आहे. येथे आजूबाजूला दऱ्याखोऱ्यांच्या निसर्ग पाहायला मिळतो.
रोहिडा किल्ल्यावर बुरूज , पाण्याचे टाके, मंदिर पाहायला मिळतात. रोहिडा किल्ल्यावर सुंदर दगडी कोरीवकाम यासारख्या प्राचीन तटबंदी आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.