'३ इडियट्स'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आमिर खानचा '३ इडियट्स' चित्रपट 2009 साली रिलीज झाला होता.
पुन्हा एकदा आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे त्रिकूट पाहायला मिळणार आहे.
गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट '3 इडियट्स' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमिर खानचा '3 इडियट्स' (3 Idiots) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. चित्रपटाची कथा आणि गाणी तरुणाईच्या काळजाला भिडतात. चाहते '3 इडियट्स'च्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 16 वर्षांनंतर प्रेक्षकांचे पुन्हा बंपर मनोरंजन करण्यासाठी '3 इडियट्स' येत आहे. '3 इडियट्स'च्या दुसऱ्या भागात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे त्रिकूट पाहायला मिळणार आहे. तसेच आमिर खानच्या हिरोईनच्या भूमिकेत पुन्हा एकदा करीना कपूर झळकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार '3 इडियट्स' च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग 2026 मध्ये सुरू होणार आहे. तर चित्रपटाचे स्क्रिप्ट तयार आहे.
2009 साली '3 इडियट्स' चित्रपट रिलीज झाला. चित्रपटातील "All Izz Well" डायलॉग आजही गाजत आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. या सिनेमातून रँचो, फरहान आणि राजू ही पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. आत ही पात्र नव्या रुपात पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच चित्रपटातील रँचो आणि प्रियाची केमिस्ट्री खूपच भन्नाट होती. '3 इडियट्स' मधून शिक्षणाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मांडण्यात आला.
'3 इडियट्स' च्या दुसरा भाग राजकुमार हिरानी दिग्दर्शित करणार आहे. तर चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि आमिर खान मिळून करणार आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.