Gharoghari Matichya Chuli Serial Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील विवाहसोहळ्यात पैठणीची थीम; कलाकारांनी दिली पारंपरिक पोशाखाला पसंती

Latest Marathi Serial Update: स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. काही भागांपासून ऐश्वर्याचं लग्न सारंगसोबत होणार की सौमित्रसोबत याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्टार प्रवाहवरील नवी मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' अगदी काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या मनात पोहचली आहे. या मालिकेमध्ये 'रंग माझा वेगळा' या मालिकेमधून घराघरात पोहचलेली आपल्या सर्वांची आवडती रेश्मा शिंदे ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या गेल्या काही भागांपासून या मालिकेमध्ये लग्नाची धामधूम सुरु असल्याचे दिसत आहे.

मालिकेमध्ये हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे कार्यक्रम पार पडून आता प्रेक्षकांना लग्नसोहळ्याची उत्सुक्ता लागली आहे. याणाऱ्या भागांमध्ये हा आगळा वेगळा विवाहसोहळा पार पडताना दिसणार आहे. लग्नापुर्वी ऐश्वर्या आणि सारंग यांचा महाकेळवण सोहळा पुण्यामधील सुप्रसिद्ध देवस्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या येथे पार पडला.

नुकताच रणदिवेंच्या घरी पारपडलेल्या विवाहसोहळ्याला 'बाईपण भारी देवा' च्या ग्रुपची धमाल पाहायला मिळाली. जानकी आणि ऐश्वर्याच्या हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यामधील लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला होता. आता त्यांच्या विवाहसोहळ्यामदील लूकसाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता दिसून येत आहे. विवाहसोहळ्यामध्ये रणदिवे आणि विखेपाटील हे दोन्ही कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला परिधान करण्यास पसंती दिली आहे. विवाहसोहळ्यात पारंपारिक पैठणीची थीम असल्यामुळे संपुर्ण कुटुंबामधील महिला पैठणी नेसून मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहेत. सोहळ्यासाठी ऐश्वर्या आणि जानकी या दोघींनी देखील नऊवारी साडी नेसत त्यावर पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांचा श्रृंगार केला आहे.

दुसरीकडे, ऋषिकेशचं पैठणी जॅकेट सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. विवाहसोहळ्यामधील या लूकविषयी बोलताना मालिकेमधील जानकी म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, ' गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील या लग्नाच्या सीनची धावपळ सुरु आहे. आम्ही कलाकार तर कसरत करतचं आहोत. पण, आमच्यासोबत मालिकेची तंत्रज्ञ मंडळी सुद्धा या कसरतीत सज्ज आहे.' प्रत्याकाच्या लूककडे विशेष कक्ष असल्याचे अभिनेत्रीने सांगीतले आहे.

विवाहसोहळ्याला परंपारिक टच देण्यााठी अमेक प्रयत्न करण्यात येत आहे. त्या सीनसाठी तयार होण्यास दोन अडीच तास लागतात. मालिकेतील लूक डिझाईन करणाऱ्या डिझाईनर्सचे प्रत्याकजन भरभरून कौतुक करताना दिसत आहे. मालिकेदरम्याण जानकी ज्या साड्या नेसते त्यांना अनेक प्रेक्षक पसंती देतात. आता तीच्या लग्नसोहळ्याचा लूक प्रेक्षकांना मोहित करेल का हे पाहानं रंजक ठरेल. मालिकेमध्ये काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सारंग आणि ऐश्वर्याच्या आग्रहाचं आमंत्रण मालिकेच्या सर्व प्रेक्षकांना कलांकारांकडून देण्यात आलं आहं.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला विश्वचषकात भारताचा विजय, जेमिमा रॉड्रिग्ज वडिलांना मिठी मारून रडली, मुंबईच्या लेकीचा भावुक क्षणाचा VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; दिग्रसकरांच्या कुटुंबावर मोठे संकट, पाहा VIDEO

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT