Sangeet Manapmaan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangeet Manapmaan: वैदेही परशुरामी आणि सुमित राघवनचा नवा लूक समोर; “संगीत मानापमान" चित्रपटाची केली घोषणा

Manasvi Choudhary

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. आज विजयादशमीचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज् ने घोषणा केली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून सुबोध भावे बरोबर सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

सुबोध भावेंचा पहिला पोस्टर जेव्हा रिलीज झाला तेव्हाच या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. वैदेहीचे नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज तर राजबिंडा पारंपरिक पोशाख मधला सुमित राघवनचा लुक पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले संगीत मानापमान नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे.

"चित्रपटा बद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले , "संगीत मानापमान या मराठीतल्या एका अत्यंत अभिजात अशा नाट्यकृती वरती काम करायला मिळणं हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्वची भूमिका करत असताना मानापमान या नाटकाशी संबंध आला, पण कधी तरी आपण त्याच्यावरती सिनेमा करू असा वाटलं हि नव्हतं. पण मधल्या काळात कट्यार नंतर नवीन चित्रपटाची आखणी करताना सगळ्यात भावलं ते म्हणजे मानापमानची प्रेम कथा तसेच गोविंदराव टेंबेंसारख्या दिग्गज अशा संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी ज्याची इतक्या वर्षानंतर ही गोडी तशीच आहे.

बालगंधर्व असतील केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील अशा दिग्गज नेत्यांचा स्पर्श,  खडीलकरांची लेखनी असं एक वेग वेगळ्या अंगाने नटलेल्या नाटका वरती प्रेरित असा सिनेमा घडवताना तितक्याच तोलामोलाची मंडळी आजूबाजूला हवी होती. जिओ स्टुडिओज ची भक्कम साथ,कट्यार आणि काशिनाथच्या वेळेस जी माझ्यासोबत टेक्निकल टीम होती ती हि तितक्याच प्रमाणे माझ्या सोबत उभी राहिली. सुमित राघवन, वैदेही आणि बरेच कलावंत आहेत ज्यांची नावं लवकरच तुमच्यासमोर येतील त्यांचा माझ्यावरचा विश्वास. मला असा वाटतं कि हा सिनेमा फक्त सुबोध भावेचा नसून संपूर्ण संघाचा सिनेमा आहे.आणि नवीन वर्षाची आमच्या संगीत मानापमान टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना हि संगीतमय प्रेम कथाभेट असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर -एहसान - लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, “संगीत मानापमान" ह्या संगीतमय चित्रपटात वैदेही परशुरामी, सुमित राघवन सोबत आणखी काही दिग्गज कलाकार असणार आहेत. हा सिनेमा नवीन वर्षात १० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याकडे दोन पिस्तुल आणि २८ राऊंड सापडले, पोलिसांची माहिती

Health Tips: सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Baba Siddique Death : आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; पोलिसांना सापडली २८ काडतुसे, सिद्धिकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी कोण?

Mumbai Crime: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबई पुन्हा हादरली, मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याचा खून

Mumbai Local: लोकल रुळावरून घसरली; पश्चिम रेल्वेची वाहतूक 3 तासांपासून विस्कळीत

SCROLL FOR NEXT