Neta Geeta Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Neta Geeta Poster : चित्रपटातून उलगडणार अनोख्या प्रेमाची राजकीय केमिस्ट्री, 'नेता गीता' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie Neta Geeta Poster : कॉलेजचे मित्र-मैत्रिण, कॉलेजमधलं पहिलं प्रेम या कॉलेजच्या आठवणी ताज्या करण्यासाठी 'नेता गीता' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Apurva Kulkarni

कॉलेज, कॉलेजच्या काळातील राजकारण, त्यात नव्यानं फुलणारं प्रेम, याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आठवणी असतील. प्रत्येकाची कॉलेज लाईफ एकदम खास असते. कॉलेजचे मित्र-मैत्रिण, कॉलेजमधलं पहिलं प्रेम हे कायम स्मरणात राहणारं असतं. याच कॉलेजच्या आठवणी ताज्या करण्यासाठी 'नेता गीता' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेत्री शिवानी बावकर हिने प्रमुख भूमिका साकारली असून सुधांशू बुडूख याने या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रथमच पदार्पण केलं आहे.

कॉलेजच्या काळातील राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा काळ रोमांचक असतो. तारूण्यातील धमक दाखवण्याची ती एक मोठी संधी असते.. त्यात नव्यानं उलगडणारं प्रेम ही रोमहर्षक असतं. कॉलेज जीवनातील राजकारण ते प्रेमाचा धमाल प्रवास 'नेता गीता' या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, 23 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिम्बारिया फिल्म्सतर्फे या 'नेता गीता' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सुधांशू महेश बुडूख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनसोबतच अभिनय देखील साकारला आहे. सुधांशू सोबत शिवानी बावकरची केमिस्ट्री या चित्रापटातून पहायला मिळणार आहे. या दोघांबरोबरच रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी या कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनयाची जोड दिली आहे. चित्रपटात निरंजन पेडगावकर यांनी संगीत तर सौमित्र धारासूरकर यांनी संकलन केलेलं आहे.

कॉलेज जीवनात तरुणाईचा उत्साह जोमाचा असतो. कॉलेजच्या एका निवडणुकीच्या निमित्ताने मनोरंजक गोष्ट 'नेता गीता' या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. पोस्टरमध्ये शिवानी बरोबर सुधांशू दिसत असून शिवानीच्या हातामध्ये भगवद्‌गीता हा प्राचीन ग्रंथ आहे. या चित्रपटात राजकारणाबरोबर भगवद्‌गीतेचा आयाम या चित्रपटात काहीसा अनुभव मिळणार आहे. या चित्रपटात मैत्रीच समीकरण, कॉलेजमध्ये फुलणारं प्रेम, राजकारण या सोबतच गीतेचं प्रवचन आपल्याला अनुभवता येणार आहे. त्यामुळेच नेता गीता चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल हे 23 ऑगस्टला स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT