Rohit Shetty 1st Marathi Movie: रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा अनुभवा स्कुल कॉलेज आणि लाईफ

Marathi movie School College Ani Life: स्कुल कॉलेज आणि लाईफ चित्रपटातून तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे.
School College Ani Life Trailer
School College Ani Life TrailerSaam TV
Published On

School College Ani Life Trailer Out: स्कुल कॉलेज आणि लाईफ हा नवीन मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने या चित्रपटाचे ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटाचे महत्वचं म्हणजे दिग्दर्शत रोहित शेट्टी यांचा हा चित्रपट आहे. या चित्रपटातून तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे.

जितेंद्र जोशीने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच तो या चित्रपटामध्ये 'चाचा'ची भूमिका साकारत असल्याची माहिती त्याने दिली आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'एक दिवस @itsrohitshetty सरांच्या कार्यालयातून संपर्क होतो, बोलालं जातं समोर स्वतः रोहित सर आणि त्यांच्यासोबत विहान सूर्यवंशी नावाचा एक तरुण दिग्दर्शक.

रोहित सर प्रेमाने सिनेमा करण्याची गळ घालतात परंतु विहान च्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचाची भूमिका करण्याची अनोखी संधी मिळाल्याचा आनंद होतो .

School College Ani Life Trailer
Abdu-MC Stan: अब्दु-स्टॅनच्या मैत्रीत दुरावा; लाईव्ह करत छोट्या भाईजानने व्यक्त केले संताप

चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात उत्तम पार पडतं . मध्ये अनेक दिवस जातात आणि अचानक फोन वर समजतं की चित्रपट प्रदर्शित होतोय. एकीकडे आपण वेगळ्याच चित्रपटाचं हिमाचल प्रदेश येथे चित्रीकरण करताना या छोट्याशा ट्रेलर सोबत पुन्हा कोल्हापुरात येऊन धडकतो हीच कमाल आहे चित्रपट या माध्यमाची खरं तर तेजस्वी, करण आणि विहान या तिघांचा हा पहिला मराठी चित्रपट परंतु प्रदर्शित जरा वेळाने होतोय कारण चांगल्या गोष्टी मुरायला आणि साध्य व्हायला वेळ लागतोच. सर्वाँना शुभेच्छा!! कसा वाटतोय ट्रेलर कळवा.'

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात खूप सुंदर आहे. जीवनातील तीन टप्पे या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहेत. अभिनेता जितेंद्र जोशी याची भूमिका खास असणार हे ट्रेलर पाहून लक्षात येते. शाळेतील मज्जा, कॉलेजमधील दंगा आणि जीवनातील आव्हाने या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. या त्याच्या पहिला मराठी चित्रपट आहे. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांच्या देखील पहिला चित्रपट आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी, विनिता खरात, अभिषेक देखमुख, प्रसाद जवादे आणि सोनाली पाटील देखील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com