Shashank Ketkar
Shashank Ketkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: रस्त्यांवरुन शशांक भडकला; व्हिडिओ सोशल मीडियावर केला शेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर असे कोणतेही महत्वाचे शहर घ्या किंवा इतर शहरातील मोठ मोठ्या रस्त्यांवर दरवर्षी पडणारे खड्डे व त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांना होत असलेला नाहक त्रास, त्यामुळे रस्ते बनवणाऱ्या, त्यांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारावर होणारी खडसून टिका, नाराजी व नापसंती दर पावसाळ्यात स्पष्ट दिसते. गेल्या काही दिवसांपासून काही मराठी सेलिब्रिटींनी रस्त्यावरील खड्ड््यांबाबत पोस्ट शेअर केल्या होत्या. असाच व्हिडिओ आता होणार सून मी या घरची फेम अभिनेता शशांक केतकरने एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्याच्या परिसरातील रस्त्याची अवस्था या व्हिडिओत दाखवत आहे.

शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओत, त्याने मालाड आणि परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था दाखण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण बाजूला ठेवत साध्या साध्या गोष्टींकडे राजकारण्यांना जनतेने निवडून दिले आहे, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, असे शशांक व्हिडिओत बोलत आहे. रहदारीच्या, महत्त्वाच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्याने विचारला आहे. अशा रस्त्यांवरून गाडी चालवणाऱ्याच्या महागड्या गाड्या खराब होतात, त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे, असे शशांक बोलतोय.

शशांकनं एक पोस्टही शेअर केली आहे. महत्त्वाचे पाच मुद्दे त्यानं या पोस्टमध्ये मांडले आहेत.

मुद्दा क्र. 1 - तू मूळचा पुण्याचा आहेस... तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्‍या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या

मुद्दा क्र. 2 - हा व्हिडिओ मुळात कोणाच्या तरी सपोर्ट साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्याच रोडबद्दल माझं म्हणण आहे.

मुद्दा क्र 3 - रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे इमॅजिन करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या इंटरनॅशनल स्कुल मध्ये सोडायला दुचाकीवरून आले आहेत किंवा म्हातार्‍या आई बाबांना डॉक्टरकडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमच्या दुचाकीवरून या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून बस आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा इमॅजिन करा ही भीती!

मुद्दा क्र 4- उत्तम सोयी आणि उत्तम रस्ते मिळाल्यावर ते नीट वापरण्याची जबाबदारी आपली नागरिकांची सुद्धा आहे.

मुद्दा क्र 5- चला एक मुव्हमेंट सुरू करु. हा चलता है अॅटिट्युड संपला पाहिजे! तुम्हाला असे रस्ते दिसले तर त्याचा व्हिडिओ पोस्ट करा. मला आणि योग्य त्या ऑथॉरिटीजला त्यात टॅग करा आणि हे करताना #YeNahiChalega हा hashtag वापरा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

SCROLL FOR NEXT