Doctor G Trailer: 'डॉक्टर जी' चा ट्रेलर प्रदर्शित, स्त्रीरोग तज्ज्ञांचा चित्रपटात संघर्ष; ट्रेलर पाहून उडणार हास्याचे फवारे

चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे सोबतच नेहमीप्रमाणे मनोरंजनाच्या धमाक्यासोबतच सध्याची सामाजिक परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Doctor G Trailer
Doctor G Trailer Saam Tv
Published On

मुंबई: बॉलिवूडचा आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन (Entertainment) करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या आयुष्मानचा 'डॉक्टर जी' चित्रपटाचा ट्रेलर (Doctor G Movie Trailer Out) प्रदर्शित झालेला आहे. चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे सोबतच नेहमीप्रमाणे मनोरंजनाच्या धमाक्यासोबतच सध्याची सामाजिक परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयुष्मानसोबत रकुल प्रित सिंह (Rakul Preet Singh) ही दिसणार आहे. आयुष्मान खुराना 'डॉक्टर जी' मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञाची (Gynecologist) भूमिका साकारत आहे.

Doctor G Trailer
'खतरों के खिलाडी सीझन १२' कोण जिंकणार? दिग्गज सेलिब्रिटिंची नावे आली समोर

काही वेळा पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून संपूर्ण ट्रेलर पाहून नक्कीच प्रेक्षकांचे हास्याचे कारंजे उडणार आहेत. चित्रपटात आयुष्मान खुरानाला ऑर्थो डॉक्टर व्हायचे होते, पण तो स्त्रीरोगतज्ज्ञ बनतो. स्त्रीरोगतज्ज्ञ एक पुरुष असल्याने पेशंट त्याच्याकडून उपचार घेण्यास नकार देतात. एवढेच नाही तर ट्रेलरमध्ये प्रसूतीदरम्यान एक व्यक्ती आपल्या पत्नीला मारहाण करतो.

Doctor G Trailer
Multiplex In Kashmir: तीन दशकानंतर काश्मिरमध्ये खुलणार पुन्हा चित्रपटगृह

चित्रपटात स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे आपल्या व्यवसायात भरपूर संघर्ष करावा लागतो. चित्रपटात गावातील बरेच लोकं त्यांची खिल्ली उडवतात. तसेच रकुल प्रित सिंह सुद्धा एक महिला डॉक्टरांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना आणि रकुल प्रित सिंह या दोघांमध्ये रोमॅंटिक केमिस्ट्री दिसत आहे. चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com