
मुंबई: टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' (khatron ke khiladi) महाअंतिम सोहळा (Grand Finale)लवकरच होणार आहे. या शोच्या शेवटचा सीझन लवकरच प्रसारित होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत शोचे शूटिंग पूर्ण झाले असून सर्व स्पर्धक भारतात परतले आहेत. आता या शोच्या विजेत्याबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. शोच्या विजेत्याचे नावे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. माहितीनुसार, शोचे होस्ट रोहित शेट्टीने विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी महाअंतिम सोहळ्यात (Grand Finale)दिग्गज सेलिब्रिटिंना आंमत्रित केले आहे.
रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीच्या प्रेक्षकांना आता शेवटच्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. लवकरच शोच्या १२व्या सीझनचा विजेता स्पष्ट होईल. माहितीनुसार, , शेवटचा एपिसोड धमाकेदार होणार आहे. यासाठी विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटिंना आमंत्रित करण्यात आले आहे.
सेलिब्रिटी यादीतील पहिले नाव बॉलिवूडचा स्टायलिस्ट अभिनेता रणवीर सिंग आहे. माहितीनुसार, शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये रणवीरला अतिशय अनोख्या आणि रोमांचक स्टाईलमध्ये पाहता येणार आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सर्कसमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना रणवीरचा डबल रोल अनुभवता येणार आहे. रोहित शेट्टीच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणवीर सिंगसोबतच बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेता वरुण शर्मा देखील दिसणार आहेत.
हा एक पीरियड कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. माहितीनुसार, चित्रपटात या दिग्गज कलाकारांसह अजय देवगण आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. विशेष म्हणजे दोघेही चित्रपटात कॅमिओ करणार आहेत. अलीकडेच रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर "सर्कस" च्या स्टार कास्टसोबत एक फोटो शेअर केला आहे. आणि त्याने"कॉमेडीचा राजा, या ख्रिसमसमध्ये #Cirkus"असा कॅप्शन दिला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.