Kiran Mane Post Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: ‘शरीरसुखाचं आमिष दाखवणार्‍या बाईला...’ किरण मानेंची तुकोबारायांचं उदाहरण देत महत्त्वाच्या विषयावर जनजागृती

Chetan Bodke

Kiran Mane Post: टेलिव्हिजन अभिनेता किरण मानेनी ‘बिग बॉस मराठी ४’ मधुन स्वतःचे अनोखं स्थान निर्माण केलं. किरण मानेने वयाच्या ५२ व्या वर्षी बिग बॉसमधुन दमदार खेळ केला. किरण माने बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या वादात अडकले होते. त्यांनी पुढे चॅनलविरोधात मानहानीची केस सुद्धा ठोकली होती. अशातच किरण मानेने एका महत्वाच्या विषयावर पोस्ट करत जनजागृती केली आहे, सध्या अभिनेत्याच्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “ ‘सेक्सची भूक’... ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो! त्या नादात माणूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं.. एकवेळ ‘बाटली’तनं मानूस सहज भायेर पडंल, पन बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्‍यात’अडकला की त्याच्या ‘नशिबानं थट्टा मांडली’च म्हणून समजा. हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायांवर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी ‘हनी ट्रॅप’ लावलावता भावांनो.. पण चारित्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की ती सुद्धा या विचारांनी भारावून गेली.. अंतर्बाह्य बदलून गेली!”

आपले तुकोबाराया त्या बाईला म्हणाले,

“पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ।।

जांई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ।।

न साहावें मज तुझें हें पतन । नकों हें वचन दुष्ट वदों ।।

तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ।।

आम्ही स्वत:ला एक नियमच घालुन ठेवलाय, परस्त्री रखुमाईसमान !

... माझे माऊली, तू जा इथनं.. आम्हाला आकर्षित करायचे कसलेही प्रयत्न करू नकोस.. आम्ही विष्णुदास तसे नसतो.

...एका स्त्रीचं असं अध:पतन होणं, मला सहन होत नाही, तू ते वावगे शब्द तोंडातून काढूही नकोस.

शेवटी तुका म्हणे, "तुला जर नवराच पायजे - तुला संगच हवाय तर बाहेर नरांची कुठं कमी आहे?” (Entertainment News)

तर आपल्या पोस्टमध्ये पुढे किरण माने म्हणतो, “...मंबाजी आणि त्याच्या टोळक्यानं एका वेश्येला पैशांचं आमिष दाखवून तुकोबारायाकडं पाठवलंवतं... पन तुकोबाराया म्हन्जे शंभर नंबरी सोनं होतं.. भुललं नाय असल्या मोहाला. या अभंगातनं तुकोबारायांनी समस्त वारकर्‍यांना एक मोलाचा संदेशबी दिलाय. “परस्त्री रखुमाईसमान आहे.” बाईकडं बघण्याची नजरच झटक्यात स्वच्छ होऊन जाते वो. शरीरसुखाचं आमिष दाखवणार्‍या बाईला “जाई वो तू माते” म्हणत दूर करायला लै लै लै टोकाचा संयम लागतो... तीसुद्धा एक बाई आहे, तिच्या शारिरीक इच्छा पूर्ण करून घ्यायचा तिला अधिकार आहे.. त्या भावनेचा मान राखत, तिला सेक्सच हवा असेल तर बाहेर अनेक ‘नर’ आहेत, तिकडे तिनं जावं हे नम्रपणे सांगणं तर अफलातून आहे !” (Marathi Actors)

पोस्टच्या शेवटी किरण माने म्हणतो, “आपल्याला शब्दांचा, भाषेचा समर्पकपणे वापर शिकायचा असंल तर तुकारामांच्या अभंगांसारखं साधन नाय! शेवटच्या ओळीत तुकोबारायांनी ‘पुरूष’ हा शब्द न वापरता ‘नर’ हा शब्द वापरलाय. इथं प्रतिभेची झलक दिसते. फक्त सेक्ससाठी एकत्र येतात ते ‘नर-मादी’ ‘पुरूष आणि स्त्री’मध्ये काहीतरी भावबंध निर्माण व्हावे लागतात! माझ्या दोस्तांनो, अफाट-अचाट-अफलातून माणूस होता आपला तुकोबाराया... खराखुरा संत. अस्सल समाजसुधारक. प्रतिभावान कवी! जोपर्यंत या पृथ्वीतलावर ‘माणूस’ आहे तोपर्यंत ही गाथा तरणार आहे..”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT