Satvya Mulichi Satvi Mulgi Latest Promo Instagram
मनोरंजन बातम्या

Satvya Mulichi Satvi Mulgi Latest Promo: नेत्राला सापडलेल्या तिसऱ्या पेटीचं रहस्य उलगडणार का?, अद्वैतचा काय आहे पेटीसोबत संबंध...

Satvya Mulichi Satvi Mulgi Latest Update: येत्या रविवारच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांसमोर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमध्ये नेमकं सर्पनिती म्हणजे काय? सर्पनितीचं रहस्य उलगडणार आहे.

Chetan Bodke

Satvya Mulichi Satvi Mulgi Serial Latest Update

सोशल मीडियावर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेची चांगलीच चर्चा होत आहे. मालिकेत दिवसेंदिवस उत्कंठावर्धक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येत्या रविवारच्या महाएपिसोडमध्ये, प्रेक्षकांसमोर सर्पनितीचं रहस्य उलगडणार आहे. नेमकं सर्पनिती म्हणजे काय?, या सर्पनितीमुळे मालिकेच्या कथानकात आणखी एक कोणता नवा ट्वीस्ट येणार?, त्या सोबत अद्वैत- नेत्रासह आणखी कोणा कोणाच्या आयुष्यामध्ये सर्पनीतीचे ट्वीस्ट येणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Serial)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या रविवारी अर्थात २६ नोव्हेंबरला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’चा प्रेक्षकांना एक तासाचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. नुकतंच मराठी टिव्ही इन्फो या सोशल मीडिया पेजवर मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, नेत्राला तिसरी पेटी सापडलेली दिसत आहे. या पेटीमध्ये एक पान आहे, त्यावर कोणती लिपी आहे, याबद्दल तिला काही माहित नाही. (Zee Marathi)

त्या लिपीविषयी नेत्रा अद्वैतला विचारताना दिसत आहे. त्याने ती सर्पलिपी असल्याचे सांगितले. या कथेमुळे मालिकेला कोणता नवा ट्रॅक मिळणार सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.प्रोमोमध्ये अद्वैतला सर्पदंश होताना दिसत आहे. सर्पदंशाचे आणि त्या पेटीबद्दलचे काही कनेक्शन आहे का? आपल्याला याचे उत्तर रविवारीच मिळेल. अद्वैत नेत्राला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तयार आहे मृत्यूला सामोरे जायला. (Marathi film)

मी तुझ्यासाठी विरोचक म्हणून मरायला तयार आहे. तू मला अद्वैत म्हणून मार असं बोलताना दिसत आहे. सध्या प्रोमोमुळे प्रेक्षकांना फारच उत्कंठा लागली आहे. या ट्रॅकमुळे मालिकेला कोणता नवा ट्वीस्ट येणार ?, याचं उत्तर प्रेक्षकांना रविवारी मिळेल. त्या सोबतच त्याला त्या लिपीबद्दल कसं कळलं?, त्याचं पुर्वजन्मातलं काही कनेक्शन आहे का? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरं चाहत्यांना पडले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? मुंबईत भाजप-ठाकरेंमध्ये काटे की टक्कर, वाचा

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

Mumbai Travel: मुंबईतील या 5 ठिकाणांना भेट दिली नाही, म्हणजे मुंबई पाहिलीच नाही

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर आलं नागराजचं सत्य; मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण, सुमन काकूचं काय होणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT