Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi Show Telecast Date Instagram
मनोरंजन बातम्या

Sa Re Ga Ma Pa Little Champs: पुन्हा एकदा वाहणार सप्तसुरांचे वारे; ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Television Show Coming Soon: नुकताच सोशल मीडियावर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या शोच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे.

Chetan Bodke

Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi Show Telecast Date: गेल्या २४ वर्ष जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या मनांवर मोहिनी घालणारी वाहिनी म्हणजे झी मराठी. महाराष्ट्रातील नव्या दमाच्या गायकांना ओळख देण्याचं खरं काम जर कोणी केले असेल तर ते झी मराठी वरील ‘सारेगमप’.

गेली १७ वर्ष आणि तब्बल १५ यशस्वी पर्व आणि भरभरून प्रेम मिळालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘सारेगमप’. ह्या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक/ गायिका महाराष्ट्राला आणि चित्रपट सृष्टीला दिल्या. मराठी संगीत क्षेत्रात ‘सारेगमप’ चं नाव नेहेमीच आदराने घेतलं गेलं आहे.

‘सा रे ग म प’ च्या प्रवासात अनेक पर्व झाली त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा.सर्वाधिक पर्व गाजलं ते ‘पल्लवी जोशी’च्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर ह्या पंचरत्नांमुळे. यंदाचं हे पर्व जरा वेगळे असणार आहे. संगीत कार्यक्रमातून हरवत चाललेला खरेपणा झी मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.

आजपर्यंत स्पर्धक ऑडिशनला येतात पण ह्यावेळी सारेगमपचे परिक्षक अखंड महाराष्ट्रातून प्रेक्षकांना भावणारे सूर शोधून आणणार आहेत. ही जबाबदारी ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘वैशाली भैसने’ यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे पण सारेगमपची विजेती महागायिका वैशाली पहिल्यांदाच परीक्षण करणार आहे.

आगामी पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा लागली आहे कि कधी सारेगमप वाहिनीवर सादर होणार आहे याची. त्यामुळे यंदाचं हे पर्व नाही तर प्रेक्षकांना सांगीतिक पर्वणी मिळेल यात शंका नाही. नुकतंच झी मराठीने सोशल मीडिया पेजवर या शोचा टीझर शेअर केला आहे. येत्या ९ ऑगस्टपासून ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ हा शो सुरू होणार असून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा झी मराठीवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

SCROLL FOR NEXT