Swanandi And Ashish Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swanandi And Ashish Engagement: स्वानंदी टीकेकरने दिली साखरपुड्याची गुडन्यूज, ‘आम्हाला जे हवे होतं तेच...’ म्हणत शेअर केला मेहंदीचा फोटो

Swanandi Tikekar Mehendi Photo: दोन दिवसांपूर्वी नात्याबद्दल उघड केल्यानंतर स्वानंदी- आशिषने सोशल मीडियावरून साखरपुड्याची घोषणा केलीय.

Chetan Bodke

Swanandi And Ashish Romantic Photos: ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम स्वानंदी टिकेकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कमालीची चर्चेत आली आहे. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये अडकल्याची माहिती दिली. ‘आमच्या दोघांचं ठरलं’ म्हणत स्वानंदीने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीसोबत काही फोटो शेअर करत ते रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती दिली. नात्याबद्दल उघड केल्यानंतर आता स्वानंदीने सोशल मीडियावरून साखरपुड्याची घोषणा केलीय.

स्वानंदीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याबद्दलची माहिती शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोत स्वानंदीने तिचा आणि बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णीसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये स्वानंदीच्या हातावर मेहंदी दिसत असून दोघांनीही त्यावर छान रोमँटिक पोज देखील दिल्या आहेत. सध्या या रोमँटिक जोडीच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होते.

स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोत दोघांनीही पारंपारिक कपडे परिधान केले असून त्यांच्या जोडीची कमालीची चर्चा होते. अभिनेत्रीने फोटो शेअर करताना रोमँटिक कॅप्शन दिले की, “आम्हाला जे हवे होतं तेच...” आणि पुढे स्वानंदीने #EngagementMehendi #SwanandiAshish असे हॅशटॅगही दिले आहेत. स्वानंदी आणि आशिषच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. मृण्मयी देशपांडे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, अक्षय वाघमारे, अमृता देशमुख, शिवानी बोरकर सहित अनेक सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २० जुलैला रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करताच तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी ही या स्वीट कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमच्या दोघांचं ठरलंय’म्हणत स्वानंदीने त्यांचं लग्न ठरल्याची माहिती दिली होती. त्याच्या ठिक दोन दिवसांनीच अभिनेत्रीने साखरपुड्याकरिता मेहंदी काढलेला एक फोटो शेअर केला.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर.. स्वानंदी अलीकडेच अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? या मराठी टेलिव्हिजन सिरीयलमध्ये झळकली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT