Aishwarya Narkar And Titiksha Tawade What Jhumka Song Instagram
मनोरंजन बातम्या

What Jhumka Viral Video: टीव्ही मालिकेतील सासू-सुनेची ‘व्हॉट झुमका’वर जबरदस्त जुगलबंदी, भन्नाट डान्स पाहून चाहते म्हणाले क्या बात!

Aishwarya Narkar And Titiksha Tawade Video: गाण्यावर अनेकांना थिरकण्याचा मोह आवरला नसून चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स शेअर केले आहेत.

Chetan Bodke

Aishwarya Narkar And Titiksha Tawade What Jhumka Song: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित येणार आहे. टीझर, ट्रेलरची चर्चा होत असताना चित्रपटातील गाण्यांचीही सर्वत्र जोरदार चर्चा होते. ‘व्हॉट झुमका’ची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा होत असून चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर रिल्स शेअर केले आहेत.

गाण्यावर अनेकांना थिरकण्याचा मोह आवरला नसून अनेक युजर्सने या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केलेय. नुकताच झी मराठीवरील एका मालिकेतील काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी या गाण्यावरील व्हिडिओ शेअर केला आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे या दोघींनाही ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर रिल्स बनवण्याचा मोह आवरलेला नाही. या दोन्हीही अभिनेत्रींनी गाण्यावर हटके साडी घालून व्हिडिओ शेअर केलाय. सध्या या गाण्यावर व्हिडिओ शेअर करणं हा एक ट्रेंडच झाला असून गाण्याची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. दोन्हीही टेलिव्हिजन अभिनेत्रींचा रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

गाण्याबद्दल थोडक्यात सांगायचे तर, ‘व्हॉट झुमका’ हे गाणं ९०च्या दशकातील ‘झुमका गिरा रे’ या गाण्याची आठवण करून देतो. या गाण्यात निर्मात्यांनी जुन्या गाण्यातील काही लिरिक्सचा देखील वापर केलेला आहे.‘व्हॉट झुमका’ हा जुन्या गाण्याचा रिमेक नसून ते गाणे ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला ‘झुमका गिरा रे’ या गाण्याची नक्की आठवण येईल. आलिया- रणवीरची या गाण्यातील लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली असून गाण्याची ही सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय.

गाण्यावर चाहत्यांसह काही सेलिब्रिटींनीही कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक युजर म्हणतो, “हे काय पाहतोय मी?? ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये एकमेकींच्या विलन असणाऱ्या या २ अभिनेत्री एकत्र डान्स करत आहेत?? बाबो... मग काय मालिकाच संपली की राव...” तर आणखी एका युजरने “मालिकेतील सासू-सुनेचा सुंदर व्हिडीओ...” अशी कमेंट केली. तर आणखी एक युजर म्हणतो, “रियल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्येही खूप चांगले एकमेकींसोबत वागा तुम्ही” अशी प्रतिक्रियाही एका युजरने दिली.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित होत असून या मालिकेत मुख्य भूमिकेत ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडेसोबत अजिंक्य ननावरे, मुग्धा गोडबोले, अजिंक्य जोशी, अमृता रावराणे यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT