Singer Tony Bennett Dies : सुप्रसिद्ध पॉप गायक टोनी बेनेट यांचे निधन; २० वेळा ग्रॅमी पुरस्काराचे ठरले मानकरी

American Pop Singer Passed Away : पॉप सिंगरचे टोनी बेनेट वयाच्या ९६ व्या वर्षी हे जग सोडून गेले आहेत.
Singer Tony Bennett Dies
Singer Tony Bennett DiesTwitter/ @ @itstonybennett
Published On

Singer Tony Bennett dies at 96 : 21 जुलै 2023 ला संगीत जगतात एक दुःखद घटना घडली आहे. गायन क्षेत्रातील प्रतिष्ठित गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले टोनी बेनेट यांचे निधन झाले आहे. पॉप सिंगरचे टोनी बेनेट वयाच्या ९६ व्या वर्षी हे जग सोडून गेले आहेत.

टोनी बेनेटचा मृत्यू कसा झाला?

टोनी बेनेटच्या मृत्यूची घोषणा त्यांच्या प्रचारक, सिल्व्हिया वेनर यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या निवेदनात केली. टोनी यांनी त्यांचा अखेरचा श्वास न्यूयॉर्कमध्ये घेतला. सिल्व्हियाने सांगितले की, त्यांच्या निधनाचे कोणतेही विशिष्ट कारण नाही.

मात्र, 2016 मध्ये त्यांना अल्झायमर आजार झाल्याचे निदान झाले होते. टोनीच्या मृत्यूची बातमी कळताच सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. (Latest Entertainment News)

Singer Tony Bennett Dies
Josephine Chaplin Dies: चार्ली चॅप्लिनची लेक काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टोनी बेनेट यांनी संगीत जगतातला एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. त्यांची एक दोन नव्हे तर आठ दशकांची सुंदर कारकीर्द होती. त्यांनी त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अशी छाप सोडली, जी कोणीही पुसून टाकू शकत नाही. इटालियन स्थलांतरितांच्या कुटुंबात जन्मलेल्या टोनीचे खरे नाव अँथनी डॉमिनिक बेनेडेटो होते.

टोनी अवघ्या 10 वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबाला गरिबीत दिवस काढावे लागले. किशोरवयात ते वेटर म्हणून काम करत असत. न्यूयॉर्कच्या स्कूल ऑफ इंडस्ट्रियल आर्टमध्ये संगीत आणि चित्रकलेचा शिक्षण त्यांनी घेतले.

टोनी दुसऱ्या महायुद्धाचा भाग होता

1944 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर टोनी यांना फ्रान्स आणि जर्मनीमध्ये लढण्यासाठी यूएस आर्मीमध्ये भरती करण्यात आले. 2013 मध्ये, सिंगरने त्यांचा भयानक अनुभव शेअर केला आणि सांगितले की ही कायदेशीर हत्या होती. या युद्धातून परतल्यानंतर टोनीने गायनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली.

त्यांचे पहिले गाणे होते- 'जो बारी'. परंतु 'बिकॉज ऑफ यू' या गाण्याने त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. टोनी खूप कमी वेळातच संगीतप्रेमींचे आवडते गायक बनला होते. टोनी यांना 20 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना जीवनगौरव पुरस्कार आणि दोन प्राइमटाइम एमी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

टोनीचे लग्न

टोनी बेनेट यांनी दोन लग्न केली. त्यांचे पहिले लग्न 1952 मध्ये पॅट्रिशिया बीचशी झाले होते, त्यांचा 1971 मध्ये घटस्फोट झाला होता. 2007 मध्ये टोनीने सुसान क्रोसोबत लग्न केले. त्यांना चार मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com