Nilesh Sable On Chala Hawa Yeu Dya Exit Instagram
मनोरंजन बातम्या

Nilesh Sable Interview: निलेश साबळेची ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट, अभिनेत्याने सांगितलं शो सोडण्यामागचं कारण

Nilesh Sable: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निलेशने शो सोडल्याची चर्चा होत होती. अखेर अभिनेत्याने याबद्दल भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Nilesh Sable On Chala Hawa Yeu Dya Exit

टिव्हीवरील कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ ने प्रेक्षकांचे आजवर निखळ मनोरंजन केले आहे. कायमच चाहत्यांच्या पसंदीस पडणाऱ्या ह्या शोमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होताना आपण आजवर पाहत आलोय. पण नुकतंच या शोमधील एका महत्वाच्या चेहेऱ्याने शो सोडल्याची चर्चा सुरू आहे. तो अभिनेता म्हणजे निलेश साबळे.

निलेश साबळे शिवाय ‘चला हवा येऊ द्या’ शो अपूर्ण आहे, असं आपण अनेकदा म्हणतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निलेशने शो सोडल्याची चर्चा होत होती. अखेर अभिनेत्याने याबद्दल भाष्य केलं आहे. पण या कार्यक्रमानंतर निलेश काय करणार ?, याबद्दलही तो म्हणला. (Marathi Actors)

नुकतंच निलेश साबळेने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या सर्वच प्लॅनिंगवर भाष्य केले आहे. मुलाखतीमध्ये निलेश म्हणतो, “मला ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाबद्दल मला कायमच अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मिळालेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानतो. काही कारणास्तव या कार्यक्रमाचा मी भाग नसणार आहे. मी सध्या काही नवं करण्याच्या प्रयत्नात आहे. सोबतच माझ्या तब्येतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. माझ्या चित्रपटाचं आणि वेबसीरीजचं काम सुरू आहे. म्हणून मी बाहेर पडलोय.” (Zee Marathi)

“मी गेल्याच आठवड्यामध्ये शो मधून बाहेर पडलोय. जरीही माझी एका शोमधून एक्झिट झाली असली तरी मी लवकरच नव्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट, नाटक, वेबसीरीज यातलं काहीही असू शकतं. डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण अजून काही ठरलं नसल्यामुळे तुमच्याशी शेअर करू शकत नाही. जे तुम्ही आतापर्यंत अनुभवलं, त्यापेक्षा वेगळं आणि खास तुमच्यासाठी मी आणेल.” असं अभिनेता निलेश साबळे म्हणाला. (Social Media)

‘चला हवा येऊ द्या’ बद्दल सांगायचे तर, हा शो २०१४ पासून सुरू झालेला आहे. तेव्हापासून निलेश साबळे होस्टिंग करीत आहे. त्याने आतापर्यंत या शोमध्ये होस्टिंग केले आहे. हा पहिला असा कार्यक्रम आहे, जो १० वर्ष चालला. या कार्यक्रमाचा वेगळा एक रेकॉर्ड आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT