Star Pravah Serial Going Off Air Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial: स्टार प्रवाहवरील 'या' लोकप्रिय मालिकेचा होणार शेवट, 'लक्ष्मीच्या पावलांनी' ईशा येतेय भेटीला

TRP rating Of Marathi Serial: गेल्या काही आठवड्यात अनेक मालिकांनी निरोप घेतला.

Pooja Dange

Thipakyanchi Rangoli Going Off Air:

टीव्ही मालिका म्हणेज प्रेक्षकांच्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मालिका दररोज घराघरात पहिल्या जातात. त्यामुळे नकळत प्रेक्षकांचे मालिकेतील पात्रांशी भावनिक नाते तयार होते. कोणतेही नाते संपले तर त्रास होतो. तसाच त्रास प्रेक्षकांना मालिका संपल्यावर होतो.

मालिका त्या त्यांच्या कथानकामुळे किंवा टीआरपीमुळे बंद होतात. परंतु प्रेक्षकांच्या मनात मालिकेतील पात्र आणि कलाकार कायमचे घर करून जातात. गेल्या काही आठवड्यात अनेक मालिकांनी निरोप घेतला. आता स्टार प्रवाहवरील आणखी मालिका बंद होणार असल्याचे वृत्त आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्टार प्रवाहवर 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही नवी मालिका २० नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका ९:३० वाजता टेलिकास्ट होणार आहे. सध्या या वेळेवर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते.

'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेच्या वेळेमुळे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका बंद होणार असे वाटत होते. परंतु 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका बंद होणार नसून 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेची वेळ बदलली असून ही मालिका ९:३० ऐवजी १०:०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)

'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका बंद होणार असल्याची अधिकृत माहिती अद्याप चॅनलकडून आलेली नाही. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली होती. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका २०२१ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली . गेली दीड - दोन वर्ष मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.

या मालिकेत प्रमुख पात्र साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतून बेहेरे पडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT