Shashank And Mrunal Meet 4 Years After He Man Bavre Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shashank Ketkar And Mrunal Dusanis Photo: शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस ‘हे मन बावरे’नंतर पुन्हा एकत्र दिसणार? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Shashank And Mrunal Meet 4 Years After He Man Bavre Serial: ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ फेम शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस हे दोघेही मालिकेच्या माध्यमातून घराघरांत प्रसिद्ध झाले. लवकरच हे दोघेही एका मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Chetan Bodke

कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या सीरियलमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस हे दोघेही होते. या मालिकेच्या माध्यमातून ही टिव्ही जोडी महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. ही मालिका २०१८ मध्ये रिलीज झालेली होतीत. तब्बल ६ ते ७ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर शशांक आणि मृणाल पुन्हा एका टिव्ही सीरियल्सच्या माध्यमातून ही जोडी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतंच शशांकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने नव्या सीरियलची हिंट चाहत्यांना दिलेली आहे.

अभिनेता शशांक केतकर कायमच इन्स्टाग्रामवर तो ॲक्टिव्ह असतो. कायमच त्याच्या इन्स्टा पोस्टची चाहत्यांसोबत जोरदार चर्चा होत असते. नुकतंच शेअर केलेल्या पोस्टमध्ये शशांकने त्याचा आणि मृणालचा एक फोटो शेअर केलेला आहे. त्या पोस्टमधून या दोघांचीही लवकरच मालिका येणार असल्याची चर्चा होत आहे. पोस्टमध्ये शशांक केतकरने लिहिलंय की, “सिद्धार्थ अनूला भेटला! मृणाल दुसानीस वेलकम बॅक... ‘हे मन बावरे’ ही मालिका संपून ४ वर्ष झाली पण, “अजूनही परत परत बघतो” अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का ?” असं कॅप्शन शशांकने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे. त्याच्या या पोस्टमुळे मृणाल आणि शशांक पुन्हा टीव्हीवर एकत्र काम करताना दिसणार का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. (Social Media)

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेनंतर मृणाल दुसानिसने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. ती परदेशामध्ये नवरा आणि तिच्या मुलीसोबत राहत होती. जवळपास चार वर्षांनी काही दिवसांपूर्वी मृणाल भारतात परतली आहे. (Tv Serial)

सध्या मृणाल टिव्ही इंडस्ट्रीतल्या जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट घेत आहे. नुकतंच मृणाल आणि शशांक दोघेही भेटले होते. अनेक वर्षांनी मैत्रिणीला भेटल्यामुळे शशांकच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. सध्या दोघांच्याही भेटी दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत. (Television Actor)

दरम्यान, शशांकने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शशांक-मृणालची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. शशांकने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

SCROLL FOR NEXT