Pinga Ga Pori Pinga SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pinga Ga Pori Pinga : महिला दिनाला वल्लरी देणार स्त्रियांना मोलाचा सल्ला, मालिकेत नेमकं काय घडणार?

Pinga Ga Pori Pinga Update : महिला दिनाच्या निमित्ताने 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरी प्रेरणाला आणि सर्व स्त्री वर्गाला मोलाचा सल्ला देणार आहे. तिचे नेमकं विचार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. वल्लरीसमोर समीरचे खरे रूप येताच ती येत्या भागामध्ये प्रेरणाला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द्व आवाज उठवण्यास प्रवृत्त करताना दिसणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीसमोर अखेर समीरचा चेहरा येणार आहे. प्रेरणा भोगत असलेला त्रास वल्लरीला कळणार आहे. समीरचा रागीट स्वभाव, प्रेरणाला तो देत असलेली वागणूक हे चुकीचं आहे आणि याची जाणीव वल्लरी प्रेरणाला करून देताना दिसणार आहे.

"समान मान स्त्रीला मिळायला हवा, तिची अस्मिता खोडू नका. जशी घर सांभाळणारी गृहलक्ष्मी आपल्यात असते तशीच अन्यायाविरुध्द्व लढणारी दुर्गा देखील आपल्यात असते." वल्लरीने दिलेल्या या मोलाच्या सल्ल्यानंतर प्रेरणा आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरुध्द्व आवाज उठवेल का? हे मालिकेत पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना ऐश्वर्या शेटे म्हणाली की, "स्त्री ही स्वतःचं रक्षण करायला सक्षम आहेच. पण त्याचबरोबर आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून यशस्वी होण्याचे सामर्थ्य सुद्धा स्त्रीकडे आहे. कधी आपल्या माणसांचा पाठिंबा लाभेल तर कधी नाही लाभणार, कधी यश येईल तर कधी हार सुद्धा अनुभवावी लागेल, पण या सगळ्यात स्त्रीची जिद्द कधी कमी होणार नाही. "

पुढे ऐश्वर्या बोलते की, " ही जिद्द प्रत्येक स्त्रीमध्ये असते हे आम्ही आमच्या मालिकेतून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. घर म्हणजे स्त्रियांची चौकट ह्या विचाराला मोडून काढणारी आजची स्त्रियांची पिढी आहे . स्त्री घरापासून दूर राहून स्वतःच आयुष्य घडवते. स्त्री घरापासून दूर राहून सुद्धा घर उत्तम सांभाळू शकते. फक्त घरच नाही तर प्रत्येक क्षेत्राला आणि देशालासुद्धा स्त्री समृद्ध करू शकते. आतापर्यंत किती तरी स्त्रियांनी हे करून दाखवलं आहे. त्यामुळे उदाहरण द्यायची आता गरज उरली नाही असं मला वाटत."

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळते. यंदा महिला दिनानिमित्त ८ मार्चला मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT