नव्या वर्षात 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) मालिकेत सरकार - सानिकाची लव्हस्टोरी झाली आहे. पण ही लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच सर्वेश नावाचं ग्रहण याला लागणार आहे. कारण आता सर्वेशमुळेच -सरकार सानिका मध्ये दुरावा येणार आहे असं वाटू लागलं आहे. सरकार सानिकाच्या मनात एकमेकांबद्दल हळूहळू प्रेम भावना निर्माण झाल्या आहेत.
सानिकाला सरकार आवडू लागला आहे. याची पूर्ण कल्पना पंकजा आणि सर्वेशला आहे. आता म्हणूनच सरकार - सानिकामध्ये कायमचा दुरावा यावा यासाठी सर्वेश एक डाव खेळणार आहे. आता सर्वेशची खेळी त्यावर उलटणार की खरचं त्यात सरकार -सानिका अडकणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
ट्रिप दरम्यान सानिकाला सरकारच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे हे कळत. दोघे ट्रिपवरून परत येतात आणि तेव्हाच पंकजा सानिकाला सांगते की, "तिचा आणि सर्वेशचा साखरपुडा ठरलाय." सानिका आणि सरकारला धक्का बसतो. हे सगळं ऐकून सरकारला वास्तवची जाणीव होते आणि तो ते स्वीकारायचं ठरवतो तर दुसरीकडे सानिकाला वाटतंय सरकारने प्रेम कबूल करावं. सानिका सरकार मिठी मारते. सानिका सरकार विचारते कि तुझ्या फिलिंग सांग ज्यावर सरकार ठामपणे नकार देतो.
सानिकाला सत्य स्वीकारता यावे म्हणून सर्वेशने सांगितल्याप्रमाणे सरकार आता सर्वेश आणि सानिकाच्या साखरपुड्याची तयारी करण्यास होकार देतो. सरकार प्रेमाची कबुली देईल का? साखरपुडा खरंच पार पडणार का? मालिकेत या पुढे काय होणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'लय आवडतेस तू मला' ही मालिका कलर्स मराठीवर रात्री ९.३० वाजता लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.